लवकरच यवतमाळ-दिग्रस रेल्वे मार्गाचे काम सुरू होणार आहे. हा मार्ग ७९ किमी लांबीचा आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग प्रकल्पाचा हा भाग आहे. हा प्रकल्प निविदा मंजूर झाल्यानंतर सुरू होईल. ३२ कि.मी च्या सपाटीकरणाचे कंत्राट पटेल इंजीनियर्सना देण्यात आले आहे, तर उर्वरित ४७ कि.मी. लांबीचे काम राज राजेश्वर कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आली आहे. दोन्ही कामे एकाच वेळी सुरू होतील. वर्धा ते यवतमाळ दरम्यानच्या नवीन रेल्वे ट्रॅकचे सपाटीकरण जवळपास पूर्ण झाले आहे. शिरपूर नदीवरील मुख्य पुलाचे बांधकाम सुरू झाले आहे.
वाशिम-यवतमाळ मतदारसंघातील शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी सांगितले की, दिग्रसपलीकडे असलेल्या रेल्वे मार्गाचे काम चार महिन्यांत हाती घेण्यात येणार आहे. रेल्वे लाइन जंगल भागातून जाणाराय. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून त्यासाठीपरवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या म्हणाल्या की, “मुख्य अडचण कर्मचार्यांची कमतरता आहे. त्यासाठी मी रेल्वेमंत्री आणि रेल्वे भरती मंडळाला रिक्त जागा भरण्यासाठी आग्रह केला आहे. जेणेकरून प्रकल्पाला गती मिळू शकेल.”
रेल्वे मार्गावरील स्थानकांचे काम लवकरच सुरू होईल. यवतमाळ येथील प्रस्तावित रेल्वे स्थानकाचे भूमीपूजन यापूर्वीच करण्यात आले आहे, असे खासदार म्हणाल्या.