Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुरुवारी यामिनी यशवंत जाधव भाजपाविरोधी निदर्शनात अग्रेसर, शुक्रवारी यशवंत जाधवांच्या घरी आयकर पथक!

मनपा निवडणुकीआधी शिवसेनेला धक्का देण्याचा प्रयत्न?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Yashwant Jadhav

मुक्तपीठ टीम

ईडीकडून नवाब मलिकांना अटक केली असल्याने महाविकास आघाडी आक्रमक झाली असतानाच आयकर विभागाकडून शिवसेना नेते आणि मुंबई मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत चव्हाणांच्या घरी धाड टाकण्यात आली आहे. त्यांच्या घरी फक्त तपासणी आहे की कारवाई हे स्पष्ट नाही. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या ईडी अटकेविरोधातील निदर्शनांमध्ये शिवसेनेकडून यशवंत जाधवांच्या आमदार पत्नी यामिनी या सर्वात आधी सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे आयकर पथकाला जाधवांच्या घरी धाडीसाठी आजचा मुहूर्त मिळाला का, अशीही चर्चा सुरु झाली आहे. मनपा निवडणुकीचं वारं वाहू लागलेलं असताना हा शिवसेनेसाठी मनपाचा खजिना सांभाळणाऱ्या स्थायी समिती अध्यक्षांवरील आयकर धाड अडचणी वाढवणारी मानली जाते.

बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर भाजपा नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. त्यामुळे आता संजय राऊतांनंतर शिवसेनेचा आणखी एका बडा नेता केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आल्याचं मानलं जातं. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जातो.

 

यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील घरी आयकर छापा…

  • आयकर विभागाने काही दिवसांपूर्वी यशवंत जाधव यांना नोटीस पाठवली होती.
  • त्यामुळेच आयकर विभागाने ही धाड टाकली असल्याची माहिती पुढे आली आहे.
  • आगामी मनपा निवडणुकांच्या निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या घरी आयकर विभागानं छापा घातला आहे.
  • यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील घरी आयकर विभागानं छापा घातला आहे.
  • सकाळी सहा वाजता जाधवांच्या घरी आयकर विभागाचं पथक दाखल झालं आहे.
  • दरम्यान, य पथकासोबत CISF पथकंही असल्याची माहिती मिळत आहे.

 

किरीट सोमय्यांचा यशवंत जाधवांवर मनी लॉण्ड्रिंगचा आरोप –

  • यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचे मनी लॉण्ड्रिंग केल्याचा आरोप केला होता.
  • यशवंत जाधव यांचे पितळ उघडे करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचे म्हटलं होतं.
  • यशवंत जाधव यांनी अनेक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून तब्बल १५ कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे.
  • भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात आरोप केले होते.
  • आयकर विभागाच्या नोटीसला समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे यशवंत जाधव यांच्या घरी धाड टाकण्यात आली.
  • गेल्या तासाभरापासून यशवंत जाधव यांची चौकशी सुरु आहे.

Tags: BMCincome taxKirit SomaiayaShivsenayamini jadhavYashwant Jadhavआयकर विभागकिरीट सोमय्यामनी लॉँड्रिंगमुंबई मनपायशवंत जाधवयामिनी जाधव
Previous Post

रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये भीषण विध्वंस! शेकडोंचे मृत्यू! पलायन वाढले!!

Next Post

युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत केंद्राशी समन्वय ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

Next Post
CM AND MAHARASHTRA STUDENTS STUCK IN UKRAINE

युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत केंद्राशी समन्वय ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!