मुक्तपीठ टीम
तरुण वय. पण या वयातच शंभरपेक्षाही जास्त अनाथांचा शैक्षणिक पालक झालेले यशवंत गोसावी म्हणजे एक वेगळं रसायन आहे. एक झपाटलेला युवा नेता. कोणाचाही डोक्यावर हात नसताना महाराष्ट्र ढवळू काढतो. जिथं संकट तिथं पोहचतो आणि समाजासाठी काही तरी देणं लागतो या भूमिकेतून संकटातील प्रत्येकाला साथ देतो. त्यामुळे यशवंत गोसावी आणि त्यांच्या शिवनिश्चल टीमचं सर्वत्र कौतुक होतं.
शिवनिश्चलचं अविरत कार्य
- यशवंत गोसावींची शिवनिश्चल सेवाभावी संस्था आईवडील नसणाऱ्या अनाथ व निराधार मुलांना शिक्षण व संगोपनाचे काम करत असते.
- शिवनिश्चल संस्थेच्या माध्यमातून मागील आठ वर्षांपासून अविरतपणे
- काम सुरू आहे.
- २०१५मध्ये गोसावींच्या मनाला शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांचा प्रश्न सतावू लागला.
- त्यातून संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील ६० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना रोख रक्कम आणि धान्याची मदत देण्यात आली.
- पुढे २०१६पासून आईवडील नसणाऱ्या अनाथ, निराधार व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षण-संगोपनाची जबाबदारी संस्थेने घेतली. ते काम आजतागायत अविरतपणे काम सुरू आहे.
निराधांसाठी शिवाधार
- आतापर्यंत संस्थेच्या माध्यमातून गोसावींनी १२४ पेक्षा जास्त अनाथांचे मुलांचे पालकत्व स्वीकारले असून त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च संस्थेच्या वतीने केला जात आहे.
- शैक्षणिक साहित्याचं वितरण घरपोच करण्यात येत आहे.
- भविष्यात निराधार मुलांसाठी शिवाधार उभारणी काम सुरू आहे.
- या प्रकल्पाअंतर्गत बांधल्या जाणाऱ्या वसतिगृहात मुलांचे शिक्षण, निवास व भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे.
यशवंत गोसावींचे आवाहन
- या मुलांसाठी मदत निधी उपक्रम संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असतात त्यात कधीही खंड पडत नाही. लॉकडाऊनच्या काळातही या मुलांना मदत देण्यात आली.
- कुठल्याही गावात कोरोना काळात आईवडिलांच्या अनाथ झालेली मुले असतील, तर त्यांची माहिती आमच्याकडे पाठवा. त्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली जाईल.
संपर्क – ८४४६४६८४४६