Wednesday, June 4, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“कोरोना काळातील विधवांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी मिशन वात्सल्य”: ॲड यशोमती ठाकूर

August 25, 2021
in सरकारी बातम्या
0
yashomati thakur

मुक्तपीठ टीम

कोरोना काळामध्ये ग्रामीण भागातील तसेच उपेक्षित वंचित घटकातील अनेक महिलांना अकाली वैधव्य आले. त्यामुळे त्यांच्या जगण्याचाच प्रश्न निर्माण झाला अशा काळात या महिलांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’ मोहिमेच्या अंतर्गत मदत केली जात असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. राज्यात गेल्या दीड वर्षात ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी कोरोनामुळे महिलांना अचानक वैधव्याला सामोरे जावे लागले आहे.

 

कोरोनामुळे मार्च २०२० नंतर विधवा झालेल्या महिलांची एकूण संख्या : १५०९५ इतकी आहे. त्यापैकी जिल्हा कृती दलाकडे यादी तयार असलेल्या महिलांची संख्या १४६६१ आहे. अशा महिलांना मदत करण्यासाठी तसंच त्यांना लागणारी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी १८ विविध सेवा देण्याचा प्रयत्न महिला आणि बाल विकास विभागामार्फत सुरू आहे. यामध्ये संजय गांधी निराधार योजने पासून अनेक योजनांचा समावेश आहे मुख्य म्हणजे ग्रामीण भागातील या महिलांसाठी घरकुल योजनेतही कशा पद्धतीने लाभ देता येईल याबाबत या वात्सल्य मिशन अंतर्गत काम सुरू असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले. यासाठी महिला आणि बाल विकास विभागाचे कर्मचारी बाल विकास प्रकल्प अधिकारी स्थानिक युनिट अधिकारी आणि कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून अशा महिलांच्या घरोघरी जाऊन त्यांना या सेवांचा लाभ दिला जात आहे. त्याबाबतची माहितीही दिली जात आहे आतापर्यंत राज्यात सुमारे साडेदहा हजार महिलांपर्यंत विभाग पोहोचला असून लवकरच त्यांना विविध लाभ मिळतील असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

 

या मोहिमेअंतर्गत विभागाने दाखल करून घेतलेल्या अर्जांची संख्या पुढील प्रमाणे….

  • संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी ८६६१ महिलांकडून अर्ज दाखल करून घेतले आहेत.
  • श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभासाठी ४०५ अर्ज दाखल झाले आहेत.
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेसाठी ७१ अर्ज भरून घेण्यात आले आहेत.
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळावा यासाठी १२०९ महिलांकडून अर्ज दाखल करून घेण्यात आले आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेसाठी केवळ तीन अर्ज विभागाकडे आले आहेत या सर्व अर्जांची एकूण संख्या पाहता वात्सल्य मिशन योजनेअंतर्गत आतापर्यंत १०३४९ महिलांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्याकडून अर्ज दाखल करून घेण्यात आले आहेत.

Tags: Adv. yashomati thakurcoronaMission VATSALYAअॅड. यशोमती ठाकूरकोरोनावात्सल्य मिशन
Previous Post

अंगणवाडी मोबाइल, खरेदी झाली भाजपा सत्तेत, पडून राहिले गोदामात, हाती मारले अंगणवाडी सेविकांच्या!

Next Post

ठाकरे सरकारच्या सूडबुद्धीने नारायण राणेंची तब्येत बिघडली! अनिल परबांच्या विरोधात न्यायालयात जाणार!

Next Post
BJP-anil parab

ठाकरे सरकारच्या सूडबुद्धीने नारायण राणेंची तब्येत बिघडली! अनिल परबांच्या विरोधात न्यायालयात जाणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!