Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अंगणवाडी मोबाइल, खरेदी झाली भाजपा सत्तेत, पडून राहिले गोदामात, हाती मारले अंगणवाडी सेविकांच्या!

सरकारी मोबाइल, भंगार क्लिष्ट! परत करण्यासाठी अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Aanganwadi Sevika Mobile phones -2

मुक्तपीठ टीम

अंगणवाडी कामकाजासाठी शासनाने दिलेले मोबाइल हे निकृष्ट दर्जाचे असून सतत नादुरुस्त होतात. यामुळे दुरुस्तीसाठीही मोठा खर्च येतो. हा प्रकार थांबवण्यात यावा, राज्य सरकारने निकृष्ट दर्जाचे मोबाईल परत घेऊन दर्जेदार मोबाईल देण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी सोमवारपासून आंदोलन सुरु केले आहे. मुंबईच्या साडेचार हजार अंगणवाडी सेविकाही आंदोलनात सामील झाल्या होत्या. आजवर २,५०० सेविकांनी सरकारने दिलेले मोबाईल विविध भागात असलेल्या एकात्मिक बालविकास योजना कार्यालयांना परत केले आहेत. हा घोटाळा मागील भाजपा सरकारच्या काळातील असून त्याची चौकशी करून तत्कालिन महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंवर कारवाई करण्याची मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या महासचिव शुभा शमीम यांनी केली आहे.

 

अंगणवाडी सेविकांच्या स्मार्ट फोनमध्ये कुरुप घोटाळा

  • अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या महासचिव शुभा शमीम यांनी दर्जाहीन मोबाइल पुरवल्याच्या विरोधात एल्गार पुकारला आहे.
    आघाडी सरकारच्या कार्यकाळात उघड झालेले हे प्रकरण म्हणजे भाजपा सत्तेतील एक घोटाळा असल्याचा आरोप शुभा शमीम यांनी केला आहे.
  • अंगणवाडी सेविकांना तत्कालीन भाजपा सरकारमधील मंत्री पंकजा मुंडे यांच्या विभागामार्फत १ लाख ५ हजार महिलांना मोबाईल वाटप करण्यात आले होते.
  • तेव्हापासून आजपर्यंत किमान ५० टक्के महिलांचे मोबाईल फोन नादुरुस्त झाले आहेत.
  • सरकारी फोनच्या दुरुस्तीसाटी येणारा खर्च संबंधित महिलांना करावा लागत आहे.
  • तसेच हे मोबाईल महिलांना देण्यापूर्वी एका गोडाऊनमध्ये २ वर्ष पडून होते.
  • तेच मोबाईल अंगणवाडी सेविकांना देण्यात आले आहे.
  • या मोबाईल खरेदीमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे.
  • या सर्व प्रकरणाबाबत पंकजा मुंडे यांची चौकशी पाहिजे, अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या महासचिव शुभा शमीम यांनी केली आहे.

Aanganwadi Sevika Mobile phones

पोषण अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्यात आले. मोबाईल निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप अंगणवाडी सेविका कृती समितीने एम ए पाटील यांनी केला आहे. संस्थेचे राज्य संघटक राजेश सिंह यांनी सांगितले की, हा बिघडलेला मोबाईल दुरुस्त करण्यासाठी सेविकांकडूनच पैसे वसूल केले जातात. ही वसुली त्वरित थांबवावी या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी मोबाईल परत करण्यासाठी आंदोलन सुरू केले आहेत.

 

मंगळवारी मुंबई आणि ठाण्यातील अंगणवाडी सेविकांनी राज्य सरकारच्या एकात्मिक बालविकास योजना कार्यालयात ४,००० हून अधिक मोबाईल परत केले आहेत. ते म्हणाले की, केंद्राने आणलेल्या पोषण ट्रॅकर अॅपमध्येही लाभार्थ्यांची माहिती नोंदवण्यात समस्या आहे. ते अॅप इंग्रजीत असल्याने अधिकच अडचण होते.


Tags: agitationanganwadi sevikamumbaipankaja mundeYashomati Thakurअंगणवाडी सेविकाएकात्मिक बालविकास योजनापंकजा मुंडेयशोमती ठाकूर
Previous Post

काँग्रेसमधील दुही संपेना…बाबा सिद्दीकींच्या मुलाच्या घराणेशाहीविरोधात सुरज ठाकुरांचा राजीनामा!

Next Post

“कोरोना काळातील विधवांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी मिशन वात्सल्य”: ॲड यशोमती ठाकूर

Next Post
yashomati thakur

"कोरोना काळातील विधवांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी मिशन वात्सल्य": ॲड यशोमती ठाकूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!