Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“अनंत यातनेवर मात करीत त्यांनी घेतली भरारी त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार”: अॅड. यशोमती ठाकूर

July 26, 2021
in घडलं-बिघडलं
0
yashomati thakur

मुक्तपीठ टीम

तिच्यावर पाशवी अत्याचार झाले, तिच्या मनाचा चोळामोळा झाला, सर्व स्वप्न धुळीस मिळाली अशा विकल अवस्थेत तिला बालगृहात आणण्यात आले. खरे तर सगळेच संपलंय अशी तिची अवस्था मात्र या अवस्थेवर, यातनेवर मात करीत तिने आज भरारी घेतली दहावीच्या शालांत परीक्षेत तिला चक्क ९७ टक्के गुण मिळालेत. तिच्या यशाच महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी कौतुक केले. ही गोष्ट तिच्या एकटीची नाही तिच्यासारख्याच बालगृह आणि अनुरक्षण गृहातील अन्य विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी मदत करण्याची ग्वाही महिला बाल विकास मंत्री ठाकूर यांनी दिली आहे.

 

शासनाच्या बालगृहात तसेच अनुरक्षण गृहात असणाऱ्या ५७४ मुला-मुलींनी दहावीच्या परीक्षेत उत्तम यश मिळवले असून त्यांचे हे यश एक महत्वाचा टप्पा असून यापुढे ही त्यांच्या उच्चशिक्षण तसेच कौशल्य विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

राज्यातील विविध कारणास्तव आधाराची गरज असलेली मुले बालगृहात तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली मुले पुनर्वसानाच्या दृष्टीने अनुरक्षण गृहात आहेत. या मुलांच्या पालन पोषणासह शिक्षण तसेच सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. अत्याचार झालेल्या किंवा अन्य कारणांमुळे बालगृहात यावे लागलेल्या तसेच वाट चुकल्यामुळे अनुरक्षण गृहात यावे लागलेल्या मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने शिक्षणाची जबाबदारी आणि काळजी विभागामार्फत घेतली जाते. त्यासाठी या मुलांना शालेय तसेच उच्च शिक्षण यासाठी मार्गदर्शन आणि मदत केली जाते. त्याच अनुषंगाने दहावीच्या परीक्षेला राज्यातील विविध बालगृह आणि अनुरक्षण गृहातील सुमारे सहाशे विद्यार्थ्यांना बसविण्यात आले होते. यापैकी या मुलांमधील ५७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात २८४ मुली आणि २९० मुलं आहेत.

 

लक्षणीय बाब म्हणजे यातील सुमारे ६० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी पहिल्या श्रेणीत अथवा विशेष श्रेणीत प्राविण्य मिळवले आहे. या मुलांच्या पुढील शिक्षणासाठी आणि कौशल्य विकास शिक्षणासाठी महिला बाल विकास विभागाच्या वतीने सर्वतोपरी मदत करून त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार असल्याचा असल्याची ग्वाही ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. तसेच या परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करीत त्यांच्या पाठीवर प्रेमाची थापही यांनी दिली आहे


Tags: Adv. yashomati thakurॲड. यशोमती ठाकूर
Previous Post

सांगलीतील भिलवडी पुरग्रस्त भागाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली भेट

Next Post

महापूर, पावसाचं पाणी आणि डोळ्यांची काळजी…डॉ. तात्याराव लहानेंचा काय सल्ला?

Next Post
Dr. Tatyarao Lahane

महापूर, पावसाचं पाणी आणि डोळ्यांची काळजी...डॉ. तात्याराव लहानेंचा काय सल्ला?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!