Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“बालसंस्थांमधील बालकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार”

बालगृहातील बालकांच्या परिपोषण अनुदानात वाढीचा फायदा

January 14, 2021
in सरकारी बातम्या
0
yashomati thakur

मुक्तपीठ टीम

 

बालगृहातील बालकांच्या परिपोषणासाठी असलेल्या २ हजार रुपयांच्या अनुदानामध्ये पुढील आर्थिक वर्षापासून (२०२१-२२) दरवर्षी ८ टक्क्याची वाढ करण्याचा निर्णय या बालकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

 

बालगृहे, निरीक्षण गृहे, खुले निवारागृहे, आणि विशेष दत्तक संस्था यामधील प्रत्येक बालकांसाठी दरमहा देण्यात येत असलेल्या २ हजार रुपये परिपोषण अनुदानात गेली अनेक वर्षे वाढ करण्यात आली नव्हती. काल झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये या परिपोषण अनुदानात दरवर्षी ८ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबाबत ॲड. यशोमती ठाकूर यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या की, महागाई दरात वाढ झाल्यामुळे अनुदानाच्या दरामध्ये वाढ करणे आवश्यक होते. ही वाढ २०२१-२२ या आर्थिक वर्षापासून लागू करण्यात येणार आहे.

 

केंद्र शासनाने डिसेंबर २०१७ च्या पत्रानुसार अंब्रेला एकात्मिक बालविकास सेवा योजना या मुख्य योजनेखाली एकात्मिक बाल विकास सेवा योजना मध्ये समाविष्ट केलेल्या योजनांमध्ये राज्य शासनाने ३० जून २०१८ च्या शासन निर्णयानुसार काही उपयोजना समाविष्ट केल्या होत्या. तथापि, केंद्र शासनाने एकात्मिक बालसंरक्षण योजनेतील घटकांसाठी निश्चित केलेले सुधारित दर लागू करण्यात आले नव्हते. महागाईतील वाढ पाहता राज्यात अनुदानाच्या दरात वाढ करणे आवश्यक होते. तसेच ‘बाल संरक्षण सेवा’ या उपयोजनेच्या दरात केलेल्या सुधारणेप्रमाणे बदल अद्याप अंमलात आलेले नसल्याने निधी वितरित करण्यास अडचणी येत होत्या.

 

परिपोषण अनुदानातील वाढीबरोबरच बाल कल्याण समितीच्या बैठकांच्या संख्येतही दरमहा १२ वरून २० इतकी वाढ करण्यास तसेच या समितीच्या व बाल न्याय मंडळाच्या बैठक व प्रवास भत्यामध्ये १ हजार रुपयांवरून १५०० रुपये इतकी वाढ करण्यास देखील मान्यता देण्यात आली.

 

केंद्र शासन पुरस्कृत बाल संरक्षणाशी सबंधित कार्यान्वित यंत्रणेची गुणवत्ता वाढविणे आणि त्या बळकट करणे या उद्देशाने एकात्मिक बाल संरक्षण योजना (इंटिग्रेटेड चाईल्ड प्रोटेक्शन स्कीम- आयसीपीएस) ही योजना राज्यात २०१२-१३ पासून महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण सोसायटीमार्फत राबविण्यात येत आहे.

 


Tags: Adv. yashomati thakurMinister for Women and Child Development Adv. Yashomati Thakurकेंद्र शासनमहिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर
Previous Post

धनंजय मुंडेंच्या मदतीला भाजप नेत्यानंतर मनसे नेता आणि एअरलाइन्सचा अधिकारीही!

Next Post

किमान हमी दराने खरीप पिकाच्या खरेदीत २७ टक्के वाढ

Next Post
किमान हमी दराने खरीप पिकाच्या खरेदीत २७ टक्के वाढ

किमान हमी दराने खरीप पिकाच्या खरेदीत २७ टक्के वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!