Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तंत्रज्ञानाचा वापर” – ॲड. यशोमती ठाकूर

March 24, 2021
in सरकारी बातम्या
0
Scotch Award

मुक्तपीठ टीम

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्यात गुणवत्तापूर्ण तंत्रज्ञानाचा वापर होत आहे, असे मत व्यक्त करत ‘माविम ई- बिझनेस प्लॅटफॉर्म’साठी मिळालेल्या स्कॉच अवॉर्डबद्दल महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी माविमचे अभिनंदन केले.

राजमाता जिजाऊ माता बाल पोषण अभियानद्वारे माविमसाठी निर्मित ‘माविम ई-बिझनेस प्लॅटफॉर्म’ ला नुकताच जानेवारीमध्ये ‘स्कॉच अवॉर्ड- सिल्व्हर’ हा देशपातळीवरील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार घोषित झाला होता. या पुरस्काराचे प्रमाणपत्र राजमाता जिजाऊ माता बाल पोषण अभियानचे संचालक संजीव जाधव यांनी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांना अवलोकनार्थ सादर केले. त्याचबरोबर ‘नागरी एकात्मिक बालविकास सेवा योजनेची पुनर्रचना’ याबाबतचा अहवालही ॲड.ठाकूर यांना सादर करण्यात आला.

‘स्कॉच अवॉर्ड’ हे पुरस्कार स्वतंत्र आणि त्रयस्थ संस्थेमार्फत देण्यात येणारे देशपातळीवरील मानाचे पुरस्कार म्हणून गणले जातात. यावर्षी तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये उत्कृष्टता (एक्सेलन्स इन टेक्नॉलॉजी) या गटात ‘माविम ई-बिझनेस प्लॅटफॉर्म’ला देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. महिला व बालविकास विभागाच्याअंतर्गत राजमाता जिजाऊ माता बाल पोषण अभियानद्वारे महिला आर्थिक विकास महामंडळासाठी या ई- बिझनेस प्लॅटफॉर्मची निर्मिती केली आहे. कोविड परिस्थितीमुळे स्कॉच पुरस्कार वितरण सोहळा पार न पडता थेट पोस्टाने हे पुरस्कार पाठवण्यात आले. हा पुरस्कार नुकताच प्राप्त झाल्यानंतर मंत्री ॲड. ठाकूर यांना अवलोकनार्थ सादर करण्यात आला.

जाधव यांच्या मार्गदर्शनाखालील राज्यस्तरीय अभ्यासगटाने ‘नागरी एकात्मिक बालविकास सेवा योजनेची (आयसीडीएस) पुनर्रचना’ याबाबतचा अहवालही मंत्री ॲड. ठाकूर यांना सादर केला. नागरी एकात्मिक बाल विकास सेवा योजना अधिक सक्षम करण्यासह नागरी आणि ग्रामीण आयसीडीएस अंतर्गत अंगणवाडी सेवांची रचना पद्धती आणि कार्यपद्धती यामध्ये अधिक सुस्पष्टता येण्यासह नागरी भागातील पोषण विषयक कामात सुसूत्रता येण्यासाठी या अहवालामध्ये शिफारसी करण्यात आल्या आहेत.

स्कॉच अवॉर्डसाठी महिला व बालविकास विभाग अंतर्गत राजमाता जिजाऊ माता बाल पोषण अभियानमार्फत ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना थेट बाजारपेठ मिळावी यासाठी तयार करण्यात आलेले ‘माविम ई-बिझनेस प्लॅटफॉर्म’चे नामांकन पाठविण्यात आले होते. त्याशिवाय पोषणाच्या बाबत मार्गदर्शन करणारी ‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ ही आयव्हीआरएस प्रणाली तसेच जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये ‘नो युवर डिस्ट्रिक्ट’ या उपक्रमासाठीही नामांकन पाठवण्यात आले होते. ‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ आणि ‘नो युवर डिस्ट्रिक्ट’ हे उपक्रम उपांत्य फेरीपर्यंत पोहोचल्याने त्यांना ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ पुरस्कार प्राप्त झाले, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

 


Tags: Adv. yashomati thakurScotch Awardस्कॉच अवॉर्ड
Previous Post

आज काय ठरलं मंत्रिमंडळाच्या बैठकीत? वाचा सर्व निर्णय एकत्र

Next Post

आजवरचे सर्वाधिक कोरोना रुग्ण, राज्यात ३१,८५५! मुंबईत ५ हजार १९०!

Next Post
MCR 24-3-21 detail -2

आजवरचे सर्वाधिक कोरोना रुग्ण, राज्यात ३१,८५५! मुंबईत ५ हजार १९०!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!