Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पालकमंत्री यशोमती ठाकुरांच्या अमरावतीत विविध ठिकाणी भेटी; नागरिकांना शांततेचे आवाहन

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Yashomati thakur

मुक्तपीठ टीम

समाजातील सर्व घटकांनी अमरावती शहरात एकोपा व शांतता राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज केले. पालकमंत्र्यांनी आज शहरात ठिकठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व शांततेचे आवाहन केले.

शहरातील घटनांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्रीमती ठाकूर या आज सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनासमवेत उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून होत्या. त्यांनी यावेळी पोलीस व जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

 

पालकमंत्र्यांनी शहरात सक्करसाथ, इतवारा, वसंत चौक, ऑटो गल्ली, वलगाव रोड, जमिल कॉलनी आदी विविध परिसराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व सर्वांना शांततेचे आव्हान केले.

 

अमरावती शहर हे सांस्कृतिक लौकिक असलेले शहर आहे. विविध नवनव्या उद्योगांच्या उभारणीमुळे औद्योगिक शहर म्हणून विकसित होत आहे. अशा शहरात तोडफोड, दगडफेकीच्या घटना घडणे अनुचित आहे. शांततेचा भंग करणे, अफवा पसरवणे आदी प्रकार घडविणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई केली जाईल. सामान्य माणसाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करू नये, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

 

सर्वपक्षीय नेत्यांनी शांतता निर्माण करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. आमदार सुलभाताई खोडके, संजय खोडके, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जगदीश गुप्ता, दिनेश बूब, विलास इंगोले, बबलू शेखावत, अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

पोलीसांतर्फे ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहे.


Tags: Adv. yashomati thakuramravatiAshish BijwalJagdish GuptaVirendra Jagtapअमरावतीआशिष बिजवलजगदीश गुप्तायशोमती ठाकुरवीरेंद्र जगताप
Previous Post

टॉपचा नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे ठार! गडचिरोलीतील पोलीस कारवाईत मारला गेला!!

Next Post

जय भीम! ‘बाबासाहेब’ कुठेही दिसत नाहीत तरीही ‘आंबेडकरवादी’ चित्रपट कसा?

Next Post
jai bheem 14-11

जय भीम! 'बाबासाहेब' कुठेही दिसत नाहीत तरीही 'आंबेडकरवादी' चित्रपट कसा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!