मुक्तपीठ टीम
यामाहाने नवीन २०२२ Yamaha MT-15 V2.0 भारतात लाँच केली आहे. भारतात या मॉ़डेलची किंमत १ लाख ६० हजार रुपये आहे. अनेक नवीन ऑप्शन्ससह भारतात सादर केले जात आहे. सायन स्टॉर्म, रेसिंग ब्लू , आइस फ्लू-वर्मिलियन आणि मेटॅलिक ब्लॅक या चार रंगांमध्ये ही बाइक आहे.
मोटारसायकल दिसायला खूप आधीच्या मॉडेलसारखी आहे. यात आईब्रोच्या आकाराच्या एलईडी डीआरएलसोबत सींगल-पॉड प्रोजेक्टर एलईडि हेडलॅम्प, टेल-सेक्शन, आक्रमक इंधन टाकी आहे.
- 2022 Yamaha MT-15 V2.0 मध्ये लीक्वीड-कुल्ड, ४-स्ट्रोक, SOHC, ४-व्हॉल्व्ह, व्हेरिएबल वाल्व्ह ऍक्च्युएशन सिस्टमसह १५५ सीसीचे इंधन इंजेक्टेड इंजिन आहे.
- याचे इंजिन १०,०००आरपीएमवर १८.४ पीएस आणि ७,५०० आरपीएमवर १४.१ एनएम पीक टॉर्क निर्माण करते.
- हे ६-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
- 2022 Yamaha MT-15 V2.0 मध्ये डिजिटल एलसीडी क्लस्टर आहे जो गीअर शिफ्ट, गीअर पोझिशन आणि VVA इंडिकेटरसह सानुकूल अॅनिमेटेड टेक्स्ट दाखवते.
- हे ब्लूटूथ वाय-कनेक्ट अॅपला सपोर्ट करते जे कॅाल, ई-मेल आणि एसएमएस अलर्ट दाखवेल.
- अॅप स्मार्टफोनवर सर्विसची माहिती, पार्किंगचे ठिकाण आणि इंधनाची माहिती देईल.