मुक्तपीठ टीम
कामाच्या ठिकाणी ताण कमी करण्यासाठी आणि उत्पादकता सुधारण्यासाठी ‘Y-Break’ अॅप आयुष मंत्रालयाच्या वतीने योग ब्रेक (Y-Break)अॅपच्या उपयुक्ततेसंदर्भातील वेबिनार नुकताच आयोजित करण्यात आला होता. यात देशभरातील तज्ज्ञ आणि नागरिकांचा सहभाग दिसून आला. वेबिनारचे उद्घाटन करताना आयुष आणि महिला व बालविकास राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई म्हणाले,“वाय – ब्रेक शिष्टाचारामधील योगासने छातीमधील पोकळी खुली करायला आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीला सहाय्य्यकारी ठरतील. मला आशा आहे की, संपूर्ण भारतातील लोक कामाच्या ठिकाणी तणाव कमी करण्यासाठी आणि उत्पादक शक्ती सुधारण्यासाठी हा सोपा आणि प्रभावी शिष्टाचार स्वीकारतील. ”
वाय – ब्रेक अॅपच्या उपयुक्ततते संदर्भातील वेबिनारमध्ये योग अभ्यासकांचा मोठा सहभाग दिसून आला.
पाच मिनिटांत ताजेतवाने, ताण कमी करण्यासाठी Y-Break अॅप
- योग शिष्टाचार -आसन, प्राणायाम आणि ध्यान-लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी केवळ पाच मिनिटांत ताजेतवाने, ताण कमी करण्यासाठी आणि कामावर पुन्हा लक्ष केंद्रित करण्यासाठी कशाप्रकारे मदत करतात याविषयी तांत्रिक सत्रे घेण्यात आल.
- स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनानिमित्त भारत सरकारच्या वतीने आयोजित, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण वर्षभर सुरु राहणार आहे.
- या महोत्सवाचे अंतर्गत विविध उपक्रम आयोजित करण्यासाठी, आयुष मंत्रालयाला ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर हा एका आठवड्याचा कालावधी देण्यात आला होता.
- या कालावधीत केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल, आयुष राज्य मंत्री आणि अन्य चार केंद्रीय मंत्र्यांनी १ सप्टेंबर रोजी विज्ञान भवनात एका शानदार समारंभात वाय – ब्रेक (Y-Break) मोबाईल अॅप चा प्रारंभ केला.