मुक्तपीठ टीम
“नोकरीच्या मागे न लागता तरुण पिढी उद्योगाकडे वळतेय, याचा आनंद वाटतो. पुण्या-मुंबईसारख्या शहरात मॉल संस्कृती रुजत आहे. अशावेळी ग्राहकांचा पसंतीक्रम, गरज ओळखून दर्जेदार व ब्रँडेड उत्पादने, माफक दरात उपलब्ध होण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पनांतून अनेक तरुण स्टार्टअप सुरु करत आहेत, हे महत्वाचे आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले.

पुण्यातील आकाश सूर्यवंशी, कुणाल पाटील, करण पाटील, श्रीतेज दरोडे व श्रीराज दरोडे या पाच तरुणांनी एकत्रितपणे सुरु केलेल्या ‘एक्सटेप’ या जागतिक दर्जाच्या फॅशन स्पोर्ट्सवेअर अँड लाईफस्टाईल ब्रँडच्या दालनाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमध्ये हे भव्य दालन सुरु झाले आहे. यावेळी ‘एक्स्टेप इंडिया’चे महाव्यवस्थापक अँटोन लिऊ, डॉ. संध्या सूर्यवंशी, हेमंत सूर्यवंशी, पंचशील रियल्टीचे संचालक सागर चोरडिया, कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, सुधीर दरोडे, जगदीश कदम, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सुतार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ऍड. निलेश निकम आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, “या पाच तरुणांनी एकत्र येऊन सुरु केलेल्या उद्योगाला शुभेच्छा देतो. एक्सटेप या जागतिक दर्जाच्या ब्रँडची उत्पादने पुणेकरांसाठी उपलब्ध झाले आहेत. या प्रकारच्या इतर ब्रँडच्या तुलनेत याच्या किमतीही कमी आहेत. ग्राहकाभिमुख सेवा देत या व्यवसायाचा विस्तार कसा होईल, यावर लक्ष्य केंद्रित करावे.”

अँटोन लिऊ म्हणाले, “भारतात एक्स्टेपचे दालन सुरु करताना आम्हाला आनंद होत आहे. स्पोर्ट्स ब्रँड म्हणून विस्तारत असलेल्या भारतीय बाजारपेठेत विविध प्रकारचे वैविध्यपूर्ण उत्पादने आम्ही देण्यास सज्ज आहोत. डायनॅमिक फोम, रियॅक्टिव्ह कॉईल, हाय-क्वालिटी सॉफ्ट पॅड, मल्टिपल एअर कुशन स्ट्रक्चरचा समावेश ‘एक्स्टेप’ तंत्रज्ञानात आहे. १५ पेक्षा जास्त देशांत ही उत्पादने विकली जात असून, गुणवत्तेबद्दल आजवर अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार, मानांकन प्राप्त झाली आहेत. काही दिवसांपूर्वीच बीजिंग येथील नॅशनल ऍक्वाटीक सेंटरमध्ये ‘वर्ल्ड क्लास रनिंग शूज’ सादर करण्यात आले आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
आकाश सूर्यवंशी म्हणाले, “पुणेकरांच्या सेवेत ‘एक्स्टेप’ या स्पोर्टस्वेअर दालनाची सुरुवात करताना आनंद वाटतो. येथील खेळाडू आणि अन्य नागरिकांना जागतिक दर्जाचे स्पोर्ट शूज, कपडे व अन्य क्रीडा साहित्य उपलब्ध होणार आहे. बूट, शॉर्ट्स, टी-शर्ट्स, हुडीज असे वैविध्यपूर्ण उत्पादने येथे असणार आहेत. ही सर्व उत्पादने शरीराला अतिशय आरामदायी व छान वाटेल, अशी आहेत.”
तंत्रज्ञानाधारित उत्पादने
एक्सटेप इंटरनॅशनल होल्डिंग्ज लिमिटेड’ ही हॉंगकॉंग स्थित मल्टिब्रँड स्पोर्ट्सवेअर कंपनी आहे. क्रीडा साहित्य, फुटवेअरमधील डिझाईन, डेव्हलपमेंट, उत्पादन, विक्री, विपणन, ब्रँड मॅनेजमेंट क्षेत्रात कंपनी कार्यरत आहे. ‘एक्स्टेप’च्या अंतर्गत ‘के-स्विस’, ‘पॅलेडियम’, ‘सौकानी’ आणि ‘मेरल्स’ हे चार ब्रँड्स आहेत. फुटवेअरमध्ये संशोधन करून विज्ञान व तंत्रज्ञानाधारित उत्पादनाची निर्मिती करणारी ही एकमेव कंपनी आहे. ४० पेक्षा अधिक संशोधक यावर काम करीत आहेत. स्पोर्ट्स सायंटिस्ट, बायोमेकॅनिस्ट, फुटवेअर रिसर्चर्स, परफॉर्मन्स इंजिनिअर्स, स्ट्रक्चरल इंजिनिअर्स, मोल्ड इंजिनिअर्स, लास्ट इंजिनिअर्स, पॅटर्न इंजिनिअर्स, केमिकल इंजिनिअर्स, मटेरियल एक्स्पर्टस, इनोव्हेशन डिझायनर्स, फुटवेअर डेव्हलपर्स आणि टेक्निशियन्स अशी मोठी टीम यामध्ये कार्यरत आहे. नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ व ग्रॅव्हिटेशनल व्हेव्हचे जनक बेरी सी. बरिश यांच्याबरोबर या तंत्रज्ञानावर काम सुरु आहे, असेही अँटोन लिऊ यांनी नमूद केले.