मुक्तपीठ टीम
शाओमी ही मोबाइलसाठी प्रसिध्द असलेली कंपनी इलेक्ट्रॉनिक्स नसलेल्या वस्तूंचेही उत्पादन करत आहे. रोजच्या वापरातील काही वस्तू या खूप उपयोगी अशा आहेत. शाओमीच्या इको-चेन कंपनी यूपिनने बनविलेली पोर्टेबल छत्री. शाओमी यूपिनने नवीन छत्री लॉन्च केली आहे. जी एलईडी लाईट, रिव्हर्स फोल्डिंग, नॉन-वेटिंग आणि एक-सेकंद ओपनिंग मॅकेनिझमसह येते. खास गोष्ट म्हणजे या छत्रीची किंमत ८०० रुपयांपेक्षाही कमी आहे.
या पोर्टेबल छत्रीमध्ये तीन हाय-ब्राइटनेस एलईडी लाईट्स आहेत. याचा प्रकाश १० मीटर अंतरापर्यंत पोहोचतो. या लाईट्स अॅडजस्ट देखील करता येतात. ज्यामुळे ब्रेकर, मॅनहोल कव्हर, दगड इत्यादी रात्रीच्या वेळी रस्त्यावर चालत असताना वापरकर्त्यास सहज दिसतील. यासह रात्रीच्या वेळी वापरकर्ते सहजपणे समोरून येणारी वाहने पाहू शकतात.
पोर्टेबल छत्रीची खास वैशिष्ट्ये
• लाईट चालू करण्यासाठी छत्रीतील हँडलबारवर स्विच दिलेला नाही आहे.
• हँडल फिरवल्यावर एलईडी लाईट चालू होते.
• लाईटसाठी चांगल्या दर्जाची बॅटरी असणे महत्त्वपूर्ण आहे.
• यूआरईव्हीओची ही छत्री एकाच बटणानेच उघडता आणि बंद करता येते.
• ही पोर्टेबल छत्री पूर्णपणे स्वयंचलित आहे. तसेच, एका हाताने ऑपरेट करणे सोपे आहे.
यूआरईव्हीओ छत्रीमध्ये पावसाचे पाणी पडणार्या पृष्ठभागावर रिव्हर्स फोल्ड देखील करता येते. यामुळे कपड्यांवर किंवा गाडीच्या सीटवर छत्री ठेवल्यास ओले होत नाही.
पोर्टेबल छत्री कशाप्रकारे तयार करण्यात आली?
• कंपनीने २१० टी हाय-डेनसिटी इम्पॅक्ट क्लोथ मटेरिअलचा वापर केला आहे.
• यात बाहेरून हायड्रोफोबिक कोटिंग आहे.
• सूर्याच्या संरक्षणापासून बचाव करण्यासाठी, यूपीएफ५०+ पर्यंतचा एक अँटी-यूव्ही थर ही छत्री तयार करण्यासाठी वापरला गेला आहे.
• या फॅब्रिकमध्ये विनल कोटिंगचा एक थर आहे, जो प्रकाश आणि उष्णतेला रोखतो.
• छत्रीची वरील चौकट बनवण्यासाठी फायबरग्लासचा वापर केला गेला आहे.