Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लेखक, वाचक चळवळीचे कार्यकर्ते नारायण बांदेकर यांचे निधन 

June 14, 2021
in घडलं-बिघडलं
0
narayan bandekar

मुक्तपीठ टीम

लेखक, वाचक चळवळीचे कार्यकर्ते आणि टाइम्स ऑफ इंडियाचे ज्येष्ठ मुद्रित शोधक नारायण बांदेकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. चार दशकांहून अधिक काळ टाइम्सच्या सेवेत असणाऱ्या बांदेकर यांचे इंग्रजी आणि मराठीवर प्रभुत्व होते. ‘टिळक गेले तेव्हा’ आणि ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची वचने’ अशी पुस्तके लिहिणाऱ्या बांदेकर हे वाचक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते होते.

 

मोठ्या प्रमाणावर वाचक वर्ग तयार व्हावा यासाठी ग्रंथालीच्या माध्यमातून शेवटपर्यंत त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. विशेष म्हणजे पत्रकारांनी बातमीदारी करताना आपल्या अनुभवांच्या आधारे पुस्तके लिहायला हवीत आणि मुख्य म्हणजे पत्रकारांचा हात सतत लिहिता असला पाहिजे, असा त्यांचा आपुलकीचा आग्रह असायचा. प्रत्यक्ष भेटून ते प्रोत्साहित करायचे. ‘आपलं महानगर’ मध्ये कामगार विषयाशी संबंधित त्यांनी सलग पाच वर्षे स्तंभलेखन केले. याशिवाय इतर वर्तमानपत्रांमध्ये ते सतत साहित्य, सामाजिक आणि कामगार विषयक लिखाण करत राहिले.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा गावी जन्म झालेल्या बांदेकर यांचे बालपण अतिशय हलाखीच्या परिस्थितीत गेले. मात्र अतिशय जिद्दी असलेल्या बांदेकरांनी घरोघरी वर्तमानपत्रे टेकवून आणि मिळेल ते काम करून एमएपर्यंत शिक्षण केले आणि टाइम्सच्या सेवेत त्यांना संधी मिळाली. हसतमुख बांदेकर यांना दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाण्यात मोठा आनंद मिळे. ज्येष्ठ सदस्य म्हणून मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


Tags: narayan bandekartimes of indiaटाइम्स ऑफ इंडियामराठी पत्रकार संघमुद्रित शोधक नारायण बांदेकर
Previous Post

दूध दर व शेतकरी प्रश्नांसाठी १७ जून रोजी महाराष्ट्रभर आंदोलन!

Next Post

भारतात पहिल्यांदाच सुरू होणार ड्रोनद्वारे औषधे पोहोचवण्याची चाचणी

Next Post
medical drones

भारतात पहिल्यांदाच सुरू होणार ड्रोनद्वारे औषधे पोहोचवण्याची चाचणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!