मुक्तपीठ टीम
दुबईत आता सर्वात उंच निवासी इमारत बांधली जाणार आहे. दुबईतील बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीनंतर ही सर्वात उंच निवासी इमारत होणार आहे. बुर्ज बिंगहट्टी जेकब रेसिडेन्स नावाची गगनचुंबी इमारत एमिराती प्रॉपर्टी डेव्हलपमेंट कंपनी बिंगहट्टी आणि घड्याळ निर्माता जेकब यांच्या संयुक्त विद्यमाने बांधली जाईल.
बुर्ज बिंगहट्टी जेकब रेसिडेन्स टॉवर!
- बुर्ज बिंगहट्टी जेकब रेसिडेन्स टॉवर १०० मजले असेल.
- ही जगातील सर्वात उंच निवासी इमारतीपेक्षा दोन मजले जास्त असेल.
- मॅनहॅटन (यूएसए) मधील ५७व्या स्ट्रीटवरील सेंट्रल पार्क टॉवर सध्या जगातील सर्वात उंच निवासी इमारत आहे.
- त्याची उंची १५५० फूट आहे.
- जगातील सर्वात उंच इमारतीचा विक्रम बुर्ज खलिफाच्या नावावर आहे.
- बुर्ज खलिफाची उंची २,७२० फूट आहे.
काय असणार टॉवरमध्ये खास…
- दुबईत बांधण्यात येणाऱ्या इमारतीच्या वरच्या भागाला हिऱ्याचा आकार असेल.
- इन्फिनिटी पूल आणि लाउंज क्षेत्रासह एक खास खासगी क्लब तयार करण्यात येणार आहे.
- वरच्या मजल्यावर पाच पेंटहाऊस बांधले जाणार आहेत.
- बिझनेस बेच्या मध्यभागी ही इमारत बांधली जाणार आहे.
- हा दुबईचा आर्थिक जिल्हा आहे.
- इमारतीचे बांधकाम कधी सुरू होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.