मुक्तपीठ टीम
जपानी स्टार्टअप AERWINS ने जगातील पहिली फ्लाइंग बाइक XTurismo अमेरिकेतील डेडेट्रॉईट ऑटो शोमध्ये तिला लाँच केली आहे. XTurismo ला अर्बन मोबिलिटीचे भविष्य म्हटले जात आहे. कंपनीच्या मते या बाईकची किंमत ७ लाख ७७ हजार डॉलर्स आहे. म्हणजेच जर तुम्ही ही रक्कम भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित केली तर तुम्हाला ६ कोटी १८ लाख रुपये खर्च करावे लागतील.
या बाईकचे वैशिष्ट्ये
- बाईकच्या पॉवरबद्दल बोलायचे झाले तर ती १०० किमी प्रतितास वेगाने ४० मिनिटे उडण्यास सक्षम असेल.
- पेट्रोलवर चालणाऱ्या X Turismo बाईकला खूप फ्युचरिस्टिक लुक देण्यात आला आहे.
- XTurismo मध्ये गॅसोलीन-इलेक्ट्रिक हायब्रिड कावासाकी इंजिन आहे.
- फ्युचरिस्टिक लुकमुळे ती हायटेक स्पोर्ट्स बाईकसारखी दिसते. .
- Airwins कंपनीने या बाइकची जपानमध्ये आधीच विक्री सुरु केली आहे.
- या बाईकचे वजन सुमारे ६६१ पाउंड (२९९ किलो) आहे.
- Aerwins XTurismo ३.७ मीटर लांब, २.४ मीटर रुंद आणि १.५ मीटर उंच आहे.
- ती हवेत ३० ते ४० मिनिटांपर्यंत जास्तीत जास्त ६० मीटर प्रतीतास वेगाने प्रवास करू शकते.
- यात दोन प्रायमरी प्रोपेलर आणि चार सेकंडरी प्रोपेलर असतात जे स्टेबिलायझर म्हणून काम करतात.
- तिचा आवाज खूप जास्त आहे, कंपनी आवाज कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
- ही बाईक बहुतांश कार्बन फायबरच्या अनेक भागांपासून बनवली आहे.
- २०२३ – २०२५ च्या दरम्यान, कंपनीतर्फे XTurismo ची लहान आवृत्ती अमेरिकेत ऑफर केली जाऊ शकते.