Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

निवास, न्याहारी तसेच महाभ्रमण योजनेबाबत एमटीडीसीमार्फत दिवेआगर येथे कार्यशाळा

February 19, 2022
in घडलं-बिघडलं
0
निवास, न्याहारी तसेच महाभ्रमण योजनेबाबत  एमटीडीसीमार्फत दिवेआगर येथे कार्यशाळा

 मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) दिवेआगर येथे २० व २१ फेब्रुवारी रोजी दोन दिवसांची निवास व न्याहारी तसेच महाभ्रमण योजनेबाबतची कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत या योजनांची माहिती पोहचावी जावी या उद्देशाने येथे सहभागी होणाऱ्या इच्छुकांना या योजनांचे स्वरूप व त्याबाबतची माहिती दिली जाणार आहे.

 

 

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवास व न्याहारी तसेच महाभ्रमण या योजनांना आजवर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, पर्यटन क्षेत्रात या उपक्रमांचे महत्व सिद्ध झाले आहे. ग्रामीण भागातील उद्योजकांना तसेच सामान्य जनतेला उत्पन्नाचा स्रोत म्हणून निवास व न्याहारी योजनेअंतर्गत नोंदणी करून आपली जागा, कक्ष किंवा निवास व्यवस्था पर्यटकांसाठी विविध सांस्कृतिक अनुभवांसह परवडणाऱ्या दरात प्रदान करता येते.

 

 

पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे तसेच खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत कुणबी समाज हॉल, दिवेआगर येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांच्या विशेष प्रयत्नाने आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यशाळेदरम्यान महामंडळाचे महाव्यवस्थापक दिनेश कांबळे हे या योजनांबाबत सादरीकरण करतील. तसेच महामंडळाच्या स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग संस्था व भविष्यातील जल पर्यटन प्रकल्प आदींबाबतचीही माहिती देतील.

 

 

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात १ हजार ४८५ जणांनी निवास व न्याहारी योजनेचा तसेच १४४ जणांनी महाभ्रमण योजनेचा लाभ घेतला आहे. व्यावसायिक पात्रता प्रस्थापित करण्यासाठी या उपक्रमांतर्गत नवीन नाव नोंदणी करण्यास इच्छुक असलेल्या स्थानिकांसाठी महामंडळामार्फत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या योजनांमुळे निवास व न्याहारी तसेच महाभ्रमण योजनेद्वारे स्थानिकांना रोजगाराची संधी निर्माण होत असून कमीत कमी गुंतवणुकीसह उत्पन्न कसे वाढवता येईल, याचेही प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे एमटीडीसीमार्फत कळविण्यात आले आहे.


Tags: AccommodationDiveagarmtdcआदिती तटकरेमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ
Previous Post

ठाणे जिल्ह्यात वेहलोळी वगळता अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण नाही! संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना!!

Next Post

जीएसटी फसवणूक: खासगी कंपनीच्या संचालकाला १६२ कोटी रुपयांच्या बोगस देयकाप्रकरणी अटक

Next Post
Everant Foremat Pvt Ltd

जीएसटी फसवणूक: खासगी कंपनीच्या संचालकाला १६२ कोटी रुपयांच्या बोगस देयकाप्रकरणी अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!