Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जीएसटी फसवणूक: खासगी कंपनीच्या संचालकाला १६२ कोटी रुपयांच्या बोगस देयकाप्रकरणी अटक

महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवाकर विभागाची कारवाई

February 19, 2022
in घडलं-बिघडलं
0
Everant Foremat Pvt Ltd

मुक्तपीठ टीम

करचुकवेगिरी करुन शासकीय महसूल बुडविणाऱ्या एका खासगी कंपनीच्या संचालकाला महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवाकर विभागाने काल मुंबईतील गिरगांव येथून अटक केली.

 

में. एव्हरंट फेरोमेट प्रायव्हेट लिमिटेड या मुंबईस्थित कंपनीने मोठ्या प्रमाणावर बोगस देयके प्राप्त केल्याचे विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर वस्तू व सेवाकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीच्या संचालकांना याबाबत विचारणा केली असता कंपनीच्या संचालकांनी सुरुवातीला आपल्याला या कंपनीच्या व्यवहारांबाबत काहीच माहीत नसल्याचे सांगितले. मात्र काही कालावधीनंतर आपणच या कंपनीच्या सर्व कारभाराबाबत जबाबदार असल्याचे विभागाला कळविले. मात्र कंपनीने घेतलेल्या बोगस देयकांसंदर्भात समाधानकारक माहिती कंपनीचे संचालक देऊ शकले नाहीत; तसेच या संदर्भात विभागाने कळविलेल्या कराचा भरणादेखील कंपनीने केला नाही.

 

विभागाने या कंपनीच्या संचालकाला १६२ कोटी रुपयांची बोगस बिले घेऊन २९ कोटी रुपये इतका बोगस इनपूट टॅक्स क्रेडीट प्राप्त केल्याप्रकरणी अटक केली. महानगर दंडाधिकाऱ्यांनी कंपनीच्या संचालकास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सहाय्यक राज्यकर आयुक्त रामचंद्र एन. मेश्राम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली आहे.

 

करचुकवेगीरी करणाऱ्या करदात्यावर कारवाई करीत महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने आतापर्यंत १६ वेगवेगळ्या प्रकरणांत अटकेची कारवाई केली असून 3 हजार कोटी रुपयांहून अधीकचे बोगस देयकांचे घोटाळे उघडकीस आणले आहेत.


Tags: जीएसटीमहाराष्ट्रमहाराष्ट्र राज्य वस्तू व सेवाकर विभागमुंबईमें. एव्हरंट फेरोमेट प्रायव्हेट लिमिटेड
Previous Post

निवास, न्याहारी तसेच महाभ्रमण योजनेबाबत एमटीडीसीमार्फत दिवेआगर येथे कार्यशाळा

Next Post

बेस्टच्या ९०० ई बसेसच्या ३६०० कोटींच्या कंत्राटात घोटाळा – मिहिर कोटेचा

Next Post
Mihir Kotecha

बेस्टच्या ९०० ई बसेसच्या ३६०० कोटींच्या कंत्राटात घोटाळा - मिहिर कोटेचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!