मुक्तपीठ टीम
कार्व्हिकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग…हा महिलांच्या योनीमार्गात अस्वच्छतेमुळे गर्भाशयाच्या तोंडावर “ह्युमन पपिल्लोमा व्हायरस’ म्हणजेच एचपीव्ही या विषाणूद्वारे होणारा कर्करोग आहे. हा विषाणू हळुवार कार्यरत होत असल्याने रोगाच्या सुरुवातीला निदान होणे कठिण असते. आजार अगदी वरच्या स्तरात पोचल्यावर त्याचे निदान होते. धक्कादायक बाब अशी की, या कर्करोगामुळे भारतात दर आठ मिनिटांनी एका महिलेचा मृत्यू होतो. कार्व्हिकल कॅन्सरच्या जनजागृतीसाठी आरोग्य संस्थांकडून जनजागृती शिबिरेही आयोजित केली जातात, ज्यामध्ये या कर्करोगाविषयी माहितीचा प्रसार, आरोग्य संस्थांवर समाजातील कार्व्हिकल कॅन्सरची माहिती, लक्षणे, ओळख, तपासणी, उपचार आणि प्रतिबंध याविषयी माहिती दिली जाते.
कार्व्हिकल कॅन्सर का होतो आणि तो टाळण्याचे उपाय काय आहेत आणि कोणत्या लक्षणांवरून तो ओळखता येतो हे जाणून घेणे सध्याच्या घडीला अत्यंत महत्त्वाचे आहे. अगदी सुरुवातीच्या टप्प्यात या कॅन्सरचे निदान होऊन वेळेत उपचार केले गेल्यास रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात.
कार्व्हिकल कॅन्सरमुळे भारतात दर ८ मिनिटांनी एका महिलेचा मृत्यू!
- भारतात दर वर्षी सुमारे दीड लाख रुग्ण आढळून येतात व उशिरा निदान झाल्याने यातील २२ हजार रुग्णांना जीव गमवावा लागतो.
- मिळालेल्या माहितीनुसार, कार्व्हिकल कॅन्सरगामुळे भारतात दर आठ मिनिटांनी एका महिलेचा मृत्यू होतो.
- कार्व्हिकल कॅन्सर पूर्णपणे टाळता येण्याजोगा आहे.
- कार्व्हिकल कॅन्सर लवकर आणि नियमित तपासणीसह योग्य उपचाराने पूर्णपणे बरा होऊ शकतो.
कार्व्हिकल कॅन्सरची लक्षणे कशी ओळखावी?
- योग्य वेळी लक्षणे ओळखून हा कॅन्सर सहज टाळता येऊ शकतो.
- वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, कार्व्हिकल कॅन्सर हा उच्च-जोखीम असलेल्या ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) मुळे होतो.
- ज्या महिलांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते, त्यांच्या शरीरातही हा विषाणू नष्ट होतो.
- तसेच, या विषाणूच्या संपर्कात जास्त काळ राहिल्यास कार्व्हिकल कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.
- सुरुवातीच्या टप्प्यातकार्व्हिकल कॅन्सरची लक्षणे आढळून येत नाहीत.
- त्याची प्रकरणे केवळ प्रगत अवस्थेत आढळतात.
- ३० ते ६५ वयोगटातील महिलांनी आरोग्य संस्थांमध्ये नियमितपणे व्हीआयए चाचण्या घेतल्या तर हा कॅन्सर सहज ओळखता येतो.
- या वयोगटातील महिलांनी त्यांच्या जवळच्या आरोग्य केंद्रात पाच वर्षांतून एकदा व्हीआयए चाचणी घेणे आवश्यक आहे.
कार्व्हिकल कॅन्सरची लक्षणे कोणती ?
- योनीतून असामान्य स्त्राव किंवा रक्तस्त्राव आणि ओटीपोटात वेदना होणे.
- लैंगिक संबंधानंतर किंवा तपासणी केल्यावर रक्तस्त्राव होणे.
- भूक कमी होणे, ओटीपोटात दुखणे, वजन कमी होणे.
- कंबर, पाय दुखणे यांसारखी लक्षणेही जाणवू शकतात.
महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. गर्भाशयाशी निगडीत आजार हे अस्वच्छतेमुळे होतात त्यामुळेत्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.