Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पालघर जिल्ह्यात महिला व बाल हक्क कल्याण समितीकडून योजनांचा आढावा

जव्हारच्या मध्यवर्ती स्वयंपाक गृहाची स्तुती

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
WCDC Overviews the Palghar schemes

मुक्तपीठ टीम / पालघर

पालघर जिल्ह्यात महिला व बाल हक्क कल्याण समिती दौऱ्यातील ४ महिला आमदारांनी जव्हार तालुक्याला भेट देऊन या भागातील महिलांच्या समस्या,महिलांसाठीच्या योजना व सोयी सुविधांची पाहणी केली. या समितीकडून संपूर्ण पालघर जिल्हा दौरा होणार आहे. या साठी दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत त्यापैकी जव्हारसाठी दुसऱ्या क्रमांकाची टीम आली असून त्यात आमदार मनीषा कायंदे,आमदार लता सोनवणे,आमदार मंजुळा गावित,आमदार गीता जैन यांचा समावेश आहे. दौऱ्याच्यावेळी या समितीने जव्हारमधील मध्यवर्ती स्वयंपाक गृहाची स्तुती केली.

WCDC Overviews the Palghar schemes

महिला व बाल हक्क कल्याण समिती दौऱ्यात समितीने प्रगती प्रतिष्ठानची कर्णबधीर शाळा,कुटीर रुग्णालय , जामसर प्राथमिक आरोग्य केंद्र, भरसटमेट अंगणवाडी, विनवळ आश्रमशाळा व मध्यवर्ती स्वयंपाक गृह, प्राथमिक शाळा वाळवंडा,अंगणवाडी वाळवंडा, ग्रामपंचायत रायतळे कातकरी समाजाचे आदिम आवास योजना वसाहत, साखरशेत आश्रमशाळा,प्राथमिक आरोग्य केंद्र वरफपाडा शाळा , अंगणवाडी या ठिकाणी भेट देऊन पाहणी करण्यात आली.

WCDC Overviews the Palghar schemes

जव्हारच्या मध्यवर्ती स्वयंपाक गृहाबद्दल चांगलं मत!

WCDC Overviews the Palghar schemes

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत, स्त्री शक्ती संस्थेच्या माध्यमातून विंनवळ येथे चालविण्यात येणाऱ्या मध्यवर्ती स्वयंपाक गृहाचा संपूर्ण आढावा या समितीने घेतला. या स्वयंपाक गृहातून जव्हार प्रकल्प अंतर्गत २९ आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना भोजन पुरवठा करण्यात येतो. या स्वयंपाकगृहातून योग्य आणि सकस आहार आश्रम शाळेतील विद्यार्थ्यंना मिळत असल्याचे मत समितीने पाहणी दरम्यान व्यक्त केले. या स्वयंपाक गृहाच्या व्यवस्थापिका सुवर्णा पाटील यांनी मध्यवर्ती स्वयंपाक गृहाच्या कार्यपद्धतीची संपूर्ण माहिती दिल्यानंतर समितीने समाधान व्यक्त केले.

WCDC Overviews the Palghar schemes

पाहा व्हिडीओ:

 

 


Tags: Geeta JainGood news MorningjawharLata SonawanePalgharSuvarna Patilगीता जैनजव्हारपालघरमंजुळा गावितमध्यवर्ती स्वयंपाक गृहमनीषा कायंदेमहिला व बाल हक्क कल्याण समितीस्वयंपाक गृह व्यवस्थापिका सुवर्णा पाटील
Previous Post

युवा नाविन्यतेस चालना देण्यासाठी अभ्यास आणि माहिती सत्र, २२ एप्रिलपर्यंत प्रवेश!

Next Post

कोल्हापूरच्या विमानतळ विस्तारीकरणाच्या भूसंपादनासाठी २१२ कोटींचा निधी

Next Post
Satej patil And Kolhapur Airport

कोल्हापूरच्या विमानतळ विस्तारीकरणाच्या भूसंपादनासाठी २१२ कोटींचा निधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!