Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

होय! आपण कोरोनाला हरवू शकतो!! ४५ दिवसाचा लढा, २५ दिवस व्हेंटिलेटरवर…महिला घरी परतली!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
corona

मुक्तपीठ टीम

जबरदस्त आत्मविश्वास…जबरदस्त इच्छाशक्ती…जबरदस्त लढाऊ वृत्ती…असं सारं एकवटलेलं असलं तर अशक्य काही नसतं. कोरोना कितीही भयंकर वाटू द्या, पण ठरवलं तर हरवणं आणि जीवन जिंकणं अशक्य नाही. नागपूरच्या स्वप्ना रसिक यांनी हे दाखवून दिलं आहे.

 

स्वप्ना रसिक यांचं ३५ वर्ष. त्या कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर तब्बल ४५ दिवस त्यांनी कोरोनाविरूद्ध लढा दिला. या ४५ दिवसांत त्या २५ दिवस व्हेंटिलेटरवर होत्या. अखेर त्यांनी कोरोनासोबतची लढाई जिंकली आणि आपल्या पाच वर्षांच्या लेकीची भेट घेतली.

 

स्वप्ना यांच्या शब्दात सांगायचे तर, “मी माझी मुलगी लोरिनाबद्दल विचार करत रहायची. त्यातूनच मला प्रेरणा मिळाली आणि शेवटी मी वाचले.” स्वप्नावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी असेही सांगितले की, जेव्हा जेव्हा स्वप्नाला शुद्ध येत असे तेव्हा ती फक्त आपल्या मुलीबद्दलच बोलायची आणि तिची विचारपूस करायची.

 

स्वप्ना १९ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह झाली होती. २४ एप्रिलला जेव्हा तिची प्रकृती चिंताजनक बनली तेव्हा तिला रुग्णालयात दाखल केले असता, तिच्या दोन्ही फुफ्फुसात संसर्ग पसरला होता. त्याचा एसपीओ २ ची पातळी ८० पेक्षा कमी होती आणि ती ठीकही होत नव्हती.

 

स्वप्नावर उपचार करणारे डॉ. परिमल देशपांडे म्हणाले की, “ऑक्सिजन थेरपी असूनही, तिचा एसपीओ २ सुधारत नव्हता. म्हणूनच, तिला व्हेंटिलेटर लावण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरला नाही. हे व्हेंटिलेटर १०० टक्के क्षमतेसह २५ दिवस वापरले गेले.” डॉक्टर म्हणाले की, ही नक्कीच एक दुर्मीळ बाब आहे. व्हेंटिलेटरवर २५ दिवस राहिल्यानंतर कोणत्याही व्यक्तीचे लवकर बरे होणे खूप कठीण आहे.

 

डॉक्टर अशोक अर्बत म्हणाले की, त्यांचे एकमेव उद्दीष्ट स्वप्नाला वाचविणे हे होते. स्वप्नाचा पती आशिष जो एका खासगी कंपनीत नोकरी करतो. रुग्णलयामधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर स्वप्नाला पुढचे सात दिवस होम क्वारंटाईन राहण्यास सांगितले. त्यानंतर ती तिच्या मुलीला भेटली.


Tags: coronaऑक्सिजन थेरपीकोरोनाडॉ. परिमल देशपांडेडॉक्टर अशोक अर्बतस्वप्ना रसिक
Previous Post

कोरोनावरील औषधे व वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटी कमी करण्याचा शिफारस मान्य

Next Post

भारतीयाचं संशोधन… मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये तयार केला हाडांना पर्याय!

Next Post
substitute for bone

भारतीयाचं संशोधन... मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये तयार केला हाडांना पर्याय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!