मुक्तपीठ टीम
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद यांच्यातील भेट पुन्हा एकदा अभिनेत्याच्या नेता बनण्याच्या चर्चेला बळ देणारी ठरली. खरंतर भेटीनंतर सोनू सूद यांनी राजकारणात रस नसल्याचा दावा केला. केजरीवालांनीही सोनू सूदने दिल्लीतील शाळकरी मुलांचे मेन्टॉर बनण्याची भूमिका स्वीकारल्याचे जाहीर केले. पण तरीही राजकीय वर्तुळात मूळ पंजाबी असणाऱ्या या अभिनेत्याच्या कोरोना संकटातील महानायक प्रतिमेचा वापर पंजाब निवडणुकीसाठी अथवा मुंबई मनपाच्या निवडणुकीतील केला जाण्याची चर्चा रंगली आहे. फक्त मुंबई मनपासाठी काँग्रेसच्या तर पंजाब निवडणुकीसाठी आपच्यावतीनं सोनूच्या नावाची चर्चा असल्यानं संभ्रम जास्तच वाढतोय.
सोनू सूद – अरविंद केजरीवाल भेटीचं टायमिंग
- पुढच्या वर्षी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
- पंजाब हे असे राज्य आहे जिथे आम आदमी पार्टी बळ वाढवण्याच्या प्रयत्नात आहे.
- गुरुवारी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी माजी मंत्री आणि अकाली (संयुक्त) नेते सेवा सिंह सेखवान यांची भेट घेतली आणि त्यांना पक्षात घेतले.
- आम आदमी पार्टीला पंजाबमध्ये एक प्रसिद्ध चेहरा शोधत आहे.
- आपने पंजाबसाठी विचार करणारा पंजाबी चेहरा आमचा मुख्यमंत्रीपदाची उमेदवार असेल, असे जाहीर केले आहे.
- त्यामुळे सोनू सूद तयार झाले तर ‘आप’चा पंजाबातील नेतृत्वाचा शोध संपू शकतो.
मानवता की सेवा में @SonuSood जी के योगदान को हम सबने देखा और सराहा है
अब सोनू जी दिल्ली के सरकारी स्कूलों में बच्चों के लिए बनाए गए ‘देश के मेंटर’ प्रोग्राम के ब्रांड एंबेसडर होंगे। सोनू जी का इस कार्यक्रम के साथ जुड़ना निश्चित ही बच्चों के उज्ज्वल भविष्य में मददगार साबित होगा। pic.twitter.com/tOtLcJU3rj
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) August 27, 2021
कोरोना महासंकटातील महानायक
- सोनु सुदची गणना केवळ अभिनेता म्हणून केली जात नाही. सामाजिक कार्यात देखील त्याचा नेहमी पुढाकार पाहायला मिळाला आहे.
- कोरोना महामारीच्या लॉकडाउन काळात सोनू सूदने स्वतःची एक वेगळी मदतकर्ता प्रतिमा तयार केली आहे.
- सोनु सुदने ‘लॉकडाऊन’मध्ये अडकलेल्या सुमारे दीड लाख लोकांना त्यांच्या घरी पोहचवण्यास मदत केली होती.
- लॉकडाऊन काळात सोनु सुद सतत सोशल मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे सामान्यांच्या संपर्कात होता आणि अनेक कामांमुळे तो चर्चेत राहीला.
‘आप’ला पाहिजे पंजाबात चेहरा!
- आम आदमी पक्षाला दिल्लीनंतर पंजाबात चांगले यश मिळाले आहे.
- त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत अकाली दल, भाजपा, काँग्रेस यांच्या समस्या लक्षात घेत लोक आपला पसंती देतील, असा आपच्या नेत्यांचा दावा आहे.
- त्यामुळे त्यांनी या राज्याच्या निवडणुकीत संपूर्ण जोर लावायचं ठरवलं आहे.
- त्यासाठी एक चांगला लोकप्रिय निर्विवाद चेहऱ्याचा आपचा शोध सुरु आहे.
- आपला पंजाबी जनेतेशी नाडी जुळलेला पंजाबी उमेदवार पाहिजे आहे.
- सोनू सूद पंजाबमधील मोगाचे रहिवासी आहेत.
- त्यांच्या मदतकार्यामुळे देशभर त्यांची महानायकासारखी प्रतिमा झाली आहे.
- त्या प्रतिमेचा आपला फायदा होईल, असे समीकरण मांडलं जात आहे.
सोनू सूद काय करणार?
- सोनू सूदच्या मदतकार्यानंतरच त्यांच्यावर छुप्या हेतूचा आरोप होऊ लागला.
- मदत करून प्रतिमा तयार करायची आणि मग राजकारणात जायचं, असे सोनूचे नियोजन असल्याचे आरोप झाले.
- सोनू सूद यांनी मात्र सातत्याने राजकारण प्रवेशाचा इंकारच केला.
- काँग्रेसच्या गोटातूनही मुंबई मनपासाठी त्यांना चेहरा म्हणून लोकांसमोर मांडायच्या रणनीतीवर चर्चा झाली.
- मात्र, आजवर सोनू सूदने कधीही राजकारण प्रवेशाला होकार दिलेला नाही.
- आताही दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या ‘देश के मेन्ट़र्स’ मोहिमेचा अँबेसिडर म्हणून ते काम करणार असल्याचे केजरीवालांनी जाहीर केले.