Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रचाराला ऊत आला, बंगालात २६६३% कोरोना उफाळला! आता तरी मोदी, शाह, ममता ३३ सभा रद्द करणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
rahul gandhi

मुक्तपीठ टीम

देशभरात कोरोनाची दुसरी लाट भीषण म्हणावी अशी उफाळत आहे. रुग्णालयांमध्ये जागा मिळणं तर दूरच आता स्मशानभूमीतही जागा मिळत नाही, एवढा कोरोना वेगानं वाढतोय.

मतदानाचे तीन टप्पे बाकी असलेल्या बंगालात निवडणूक प्रचार काळात कोरोना तब्बल २६६३ टक्के वाढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुढच्या तीन टप्प्यातील प्रचार राजकीय नेत्यांनीच आवर घालण्याची मागणी जोर धरत आहे.

 

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या सभा रद्द केल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि ममता बॅनर्जी यांच्या सभाही रद्द करण्याची मागणी जोर धरत आहेत. कारण त्यांच्या तब्बल ३३ सभा आहेत.

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसाठी सर्व पक्षांच्या नेत्यांनी कोरोना सुरक्षा नियम पायदळी तुडवत केलेला गर्दीतील प्रचारही कोरोना उफाळण्यासाठी जबाबदार असल्याचे सांगितले जाते. उदाहरण म्हणून मतदानाचे तीन टप्पे बाकी असलेल्या बंगालमध्ये निवडणूक काळात उद्रेक झालेल्या कोरोनाचे उदाहरण दिले जाते.

 

कोरोना देशात नियंत्रणाबाहेर आहे. दररोज २ लाखांहून अधिक प्रकरणं नोंदवली जात आहेत. देशातील नागरीक घाबरले आहेत. सरकार लोकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आणि मास्क घालण्याचा सल्ला देत आहेत, परंतु निवणूक प्रचाराच्या नावाखाली सरकार स्वत:च या नियमांची पायमल्ली करत असल्याचे दिसून येत आहे.

 

त्यामुळे बंगालमध्ये परिस्थिती आणखी बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बंगालमध्ये येत्या आठ दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ६, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या १० आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या १७ प्रचारसभा होणार आहेत.

आता पर्यंत झालेल्या प्रचारसभेमध्ये कोरोना नियमांचा पुरता फज्जा उडवत मोठ्या प्रमाणात गर्दी लोकांनी केली आहे. या गर्दीत झालेल्या सभेचे प्राणघातक परिणामही समोर येत आहेत. निवडणूक प्रचार सुरू झाल्यापासून कोरोनाचा संसर्ग २६००% वाढला आहे. जाणून घेऊया पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूमधील बिघडत्या परिस्थितीसाठी कोण जबाबदार आहेत?

पश्चिम बंगाल

  • पाच राज्यांपैकी आता फक्त पश्चिम बंगालमध्येच निवडणुकांचे तीन टप्पे बाकी आहेत.
  • पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे प्रचार सभा घेत आहेत.
  • या सभेमध्ये लाखोंची गर्दी आहे.
  • ९०% लोकांनी मास्क घातलेला नाही. सोशल डिस्टन्सिंग सारख्या नियमांचे पालन होताना दिसत नाही आहे.
  • शुक्रवारी राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. असे असूनही सभेमध्ये कोरोना नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे.
  • येत्या ८ दिवसांत मोदींच्या ६, अमित शहांचे १० आणि ममता बॅनर्जी यांच्या १७ सभा होणार आहेत.
    याशिवाय इतर नेत्यांच्या बैठका व सभा होत आहेत.
  • निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या २६ फेब्रुवारी पासून, कोरोनाचा वेग २६६३% वाढला आहे.
  • हा वाढ दर २६ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत ७ दिवसात सापडलेल्या कोरोनाच्या एकूण आकडेवारीवर आधारित आणि या आठवड्यात म्हणजे १० ते १६ एप्रिल दरम्यान सापडलेल्या कोरोनाच्या एकूण आकडेवारीवर आधारित आहे.
  • २६ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान १२०५ रुग्ण आढळले, तर १० ते १६ एप्रिल दरम्यान ३३,२९७ रूग्ण सापडले.

आसाम

  • पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या प्रचार सभांना बरीच गर्दी झाली होती.
  • फेब्रुवारीमध्ये तेथे ७ दिवसात केवळ ९५ कोरोना रुग्ण आढळत होते, आता आठवड्यातून २,९८२ रुग्ण आढळून येत आहेत.

केरळ

  • येथे ६ एप्रिल रोजी निवडणुकीचा गोंधळ थांबला, परंतु आता कोरोनाने हाहाकार माजवला आहे.
  • जोपर्यंत येथे निवडणूक होती तोपर्यंत नेत्यांनी बऱ्याच सभा घेतल्या. सभांमध्ये मोठा जमाव जमला. गेल्या एका आठवड्यात येथे ४७,१२८ नवीन रुग्ण आढळले आहेत.

तामिळनाडू

  • २६ फेब्रुवारीपासून कोरोनाची गती १४५०% वाढली आहे.
  • फेब्रुवारीमध्ये दर ७ दिवसांत सुमारे २ हजार रुग्ण आढळले, आता ते थेट ४४ हजारांवर पोहोचले आहे.

पुद्दुचेरी

  • साधारणत: दररोज १० ते २० प्रकरणे यायची, परंतु निवडणूक सभेनंतर दररोज ५०० हून अधिक लोकांना संसर्ग होत आहे.
  • कोरोनाचा वेग येथे २६३८% ने वाढला आहे. तरीही तेथे बऱ्यापैकी सुरक्षा नियम पाळले गेले आहेत.

Tags: Rahul gandiगृहमंत्री अमित शहानिवडणूक प्रचारपंतप्रधान नरेंद्र मोदीपश्चिम बंगालमुख्यमंत्री ममता बॅनर्जीं
Previous Post

#मुक्तपीठ रविवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

Next Post

‘तानाजी’चा पराक्रम आता लवकरच मराठीतही!

Next Post
तानाजी

'तानाजी'चा पराक्रम आता लवकरच मराठीतही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!