Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

न्यायालयाच्या निर्देशानंतर तरी लोणार सरोवर प्रदूषणमुक्त होणार?

August 1, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Lonar_Crater_Lake

मुक्तपीठ टीम

बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या संवर्धन आणि विकासासाठी दोन आठवड्यात विकास प्राधिकरण स्थापन करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत. हा तलाव पन्नास हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक उल्कापिंड धडकल्याने निर्माण झाला होता. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारनेही लोणार सरोवराच्या प्रूदषणमुक्तीसाठी पावलं उचलण्याची घोषणा केली होती. आता न्यायालयाच्या निर्देशांनंतर त्या पावलांचा वेग वाढण्याची शक्यता आहे.

 

न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अनिल किलोर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याचिकाकर्त्याने तलावाचा बदलता रंग आणि संवर्धनाची गरज यावर चिंता व्यक्त केली होती. जगभरातील शास्त्रज्ञ त्यावर संशोधन करायला येतात. गेल्या वर्षी पाण्याचा रंग गुलाबी झाला होता, ज्यामुळे हा तलाव केवळ स्थानिक लोकांमध्येच नव्हे तर शास्त्रज्ञांमध्येही कुतूहलाचा विषय बनला होता.

 

वकील सी.एस. कप्टन हे एक ‘अमीकस क्युरि’ आहेत आणि सरोवराच्या संवर्धनासाठी स्थापन केलेल्या न्यायालयीन समितीचे सदस्य आहेत.

 

लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी आणि विकासाकरिता’लोणार क्रेटर लेक अथॉरिटी’ नावाची स्वतंत्र केंद्रीय संस्था स्थापन करण्यासाठी त्यांनी २७ जुलै रोजी उच्च न्यायालयात प्रस्ताव सादर केला. न्यायालयाने यावर अमीकस क्युरिआकडून नवीन प्रस्ताव प्राप्त झाला आहे आणि केंद्रीय समिती स्थापन करणे योग्य होईल, असे सांगितले.

 

उल्कापातामुळे निर्माण झालेल्या विवरातील सरोवर

  • लोणारचे सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे.
  • लोणार सरोवराची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली.
  • लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे.
  • याचे पाणी अल्कधर्मी आहे.
  • लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे.
  • या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत.
  • त्यातील १५ मंदिरे विवरातच आहेत.
  • सरोवराची निर्मिती ५२,००० ± ६००० वर्षांपूर्वी झाली असे मानले जाते. पण २०१० साली प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात सरोवराचे वय ५,७०,००० ± ४७,००० वर्ष इतके वर्तवण्यात आले आहे.
  • अमेरिकेतील स्मिथसोनिअन संस्था, युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्व्हे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी यासारख्या संस्थांनी या सरोवरावर बरेच संशोधन केले आहे.

Tags: buldhanalonar lakemumbai high courtबुलढाणामुंबई उच्च न्यायालयलोणार सरोवर
Previous Post

‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा

Next Post

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १०७पैकी केवळ १८ तास काम!

Next Post
mansoon session

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १०७पैकी केवळ १८ तास काम!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!