Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुख्यमंत्री ममतांना आमदारकी मिळणार तरी कधी?

बंगालात महाराष्ट्राची आठवण करून देणारी स्थिती...आयोग काय करणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mamata banerjee ec

मुक्तपीठ टीम

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसाठी पद टिकवण्याची चिंता अद्याप सरलेली नाही. ममता जर येत्या काही दिवसात आमदार झाल्या नाही, तर त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. नियमानुसार पदावर राहण्यासाठी सहा महिन्यात म्हणजे नोव्हेंबरपूर्वी आमदार होणे आवश्यक आहे. यासाठी तृणमूल काँग्रेसकडून सतत निवडणूक आयोगाकडे पोटनिवडणूक घेण्याची मागणी केली जात आहे.

बंगालात विधानपरिषद नसल्याने विधानसभेत निवडून जाण्याचा एकमेव पर्याय आहे. याच पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्यात दुर्गा पूजेपूर्वी राज्यात पोटनिवडणुका घेणे शक्य आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने केंद्रीय आयोगाला कळवले आहे. जर तसं झालं नाही तर ममता बॅनर्जींना मुदत संपण्यापूर्वी पदाचा राजीनामा देऊन पुन्हा शपथ घेण्याचा पर्याय निवडावा लागेल.

 

बंगालात ममतांसाठी निवडणूक आवश्यक

  • पश्चिम बंगालमध्ये या वर्षी विधानसभा निवडणुका झाल्या.
  • विधानसभा निवडणुकीत ममता या नंदीग्राममधून उभ्या होत्या, मात्र त्यांचा पराभव झाला.
  • मात्र, तृणमूल काँग्रेसला दणदणीत बहुमत मिळाल्यामुळे त्या मुख्यमंत्री झाल्या.
  • आता नियमानुसार त्यांनी शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यात सभागृहाचे सदस्य होणे आवश्यक आहे.
  • विधानसभा सभागृहातील सात जागा या रिक्त आहेत.
  • मात्र, अद्याप निवडणूक आयोगाने निवडणूकच घोषित केलेली नाही.

 

बंगालची परिस्थिती महाराष्ट्रासारखी!

  • बंगालची परिस्थिती काहीशी महाराष्ट्रासारखी झाली आहे.
  • महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते.
  • अखेर ते विधानपरिषदेचे सदस्य झाल्याने त्यांना पदावर राहण्यात अडचण आली नाही.
  • पण त्यांच्याही डोक्यावर अखेरपर्यंत अनिश्चिततेची टांगती तलवार होते.
  • महाराष्ट्रात विधानपरिषद असल्याने ठाकरेंचा मार्ग लगेच मोकळा झाला, पण बंगालात एकच सभागृह असल्याने त्यांच्यासाठी विधानसभा निवडणुकीचाच मार्ग आहे.

 

अधिकाऱ्यांची आयोगाला दुर्गा पूजेआधी पोटनिवडणूक घेण्याची मागणी

  • तृणमूल काँग्रेस बऱ्याच काळापासून राज्यात पोटनिवडणुकीची मागणी करत होता.
  • ममतांना ५ नोव्हेंबरपर्यंत लोकांनी निवडून देण्याची गरज आहे.
  • निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे की १० ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर दरम्यान सणांचा हंगाम असेल.
  • या काळात निवडणुका घेणे अशक्य आहे.
  • त्यामुळे राज्याच्या अधिकाऱ्यांनी आयोगाला दुर्गा पूजेआधी पोटनिवडणूक घेण्यास सांगितले आहे.
  • राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की आमच्याकडे एक महिन्यापेक्षा जास्त वेळ आहे. आयोगाने अधिसूचना जारी केल्यास दुर्गापूजेपूर्वी निवडणुका घेणे शक्य आहे.
  • मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी बुधवारी पश्चिम बंगालचे मुख्य सचिव एच के द्विवेदी, उप निवडणूक आयुक्त सुदीप जैन आणि मुख्य विद्युत अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली.
  • ही बैठक प्रामुख्याने राज्यातील निवडणुका घेण्याशी संबंधित परिस्थिती समजून घेण्यासाठी करण्यात आली होती.

 

बैठकीत काय चर्चा झाली?

  • या बैठकीत राज्यातील कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती आयोगाच्या अधिकाऱ्यांनाही देण्यात आली.
  • याशिवाय राज्यातील पूर परिस्थितीशी संबंधित माहितीही आयोगाला देण्यात आली.
  • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने दुर्गा पूजा आणि इतर सणांच्या तारखा दिल्या आहेत. ते म्हणाले की सणापूर्वी निवडणुका घेणे ही एक चांगली कल्पना आहे.
  • ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची प्राथमिक तपासणीही करण्यात आली आहे.

 

कुठे होणार पोटनिवडणुका?

  • भभानीपूर
  • कर्डा
  • गोसाबा
  • शांतिपूर
  • जंगीपूर
  • शमशेरगंज
  • दिनहाटा

Tags: cm uddhav thackerayECMaharashtraMamata BanerjeeTMCwest bengalतृणमूल काँग्रेसनिवडणूक आयोगपश्चिम बंगालमहाराष्ट्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुख्यमंत्री ममता बॅनर्जीं
Previous Post

“इंधन, गॅसच्या किंमती वाढवून मोदी सरकारकडून जनतेचे रक्तशोषण!”: नाना पटोले

Next Post

‘पोषण माह’मध्ये अव्वल क्रमांक मिळवण्याबरोबर कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

Next Post
yashomati thakur

‘पोषण माह’मध्ये अव्वल क्रमांक मिळवण्याबरोबर कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!