मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना महत्वाचा सल्ला दिला आहे, “मीही पक्ष सोडला, पण चिन्हासाठी भांडलो नाही. एकनाथ शिंदेंनीही शिवसेनेच्या धनुष्यबाणावर दावा करू नये.” अर्थात भाजपा अधिकृतपणे मान्य करत नसली तरी त्यांच्याकडून मिळालेल्या सर्व प्रकारच्या मदतीववरच शिंदेंचं बंड झालेलं आहे. त्यामुळे मूळ शिवसेनेचं नुकसान होईल ती चिन्ह काढून घेण्याची मागणी शिंदे सोडणं शक्य आहे का, अशी चर्चा आहे.
काय म्हणाले शरद पवार?
- शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना एक सल्ला देऊ केला आहे.
- ते बुधवारी बारामतीमधील पत्रकारपरिषदेत बोलत होते.
- धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे.
- एखाद्या पक्षाचे चिन्ह अशाप्रकारे काढून घेणे योग्य नाही.
- जर एकनाथ शिंदे यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर ते वेगळा पक्ष काढू शकतात.
- जेव्हा मी काँग्रेस मधून बाहेर पडलो तेव्हा वेगळा पक्ष काढला, वेगळं चिन्ह घेतलं.
- मी काँग्रेस पक्षाचं चिन्हं मागितलं नाही.
- त्याच्यातून वादविवाद वाढवणे योग्य नाही.
देवेंद्र फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर
- शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष सोडला तेव्हा पक्षांतरबंदी कायदाच अस्तित्त्वात नव्हता.
- आज तो कायदा अस्तित्त्वात आहे.
- आज कायदे तयार झाले म्हणून शिंदे साहेब म्हणजे शिवसेना कायदेशीर लढाई लढत आहे.