Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रानभाज्यांविषयी सर्व काही, विद्यार्थ्यांचा वेगळा प्रकल्प, राज्यस्तरावर सादरीकरण

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
sustainable food source' project at state level

मुक्तपीठ टीम

मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद नेहमी वैज्ञानिक प्रकल्प राबवत असते. मुलं नेहमी आपल्या परिसरातील विषय निवडून या परिषदेत सहभाग घेत असतात. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेच्या राज्यस्तरावर सादरीकरणासाठी यंदा ‘रानभाज्या – एक शाश्वत अन्नस्त्रोत’ या प्रकल्पाची निवड झाली आहे. पालघरच्या वाडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मोजच्या विद्यार्थ्यांच्या गटाने हा प्रकल्प तयार केला आहे. जिल्हा स्तरावर बालविज्ञान परीषदेत मोज शाळेच्या दोन गटांनी सहभाग घेऊन सादरीकरण केले होते.

 

रानभाज्या प्रकल्पात नेमक्या कोणत्या गोष्टीचा समावेश

  • या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेकरिता मोज जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘ रानभाज्या – एक शाश्वत अन्नस्रोत’ हा विषय निवडून संशोधन केलं आहे.
  • रानभाज्या हा ग्रामीण भागातील लोकांच्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे.
  • या रानभाज्या कोणत्या, त्या कधी खातात त्यातील कोणत्या रानभाज्या साठवून ठेऊन वर्षभर खाल्ल्या जातात, त्यावर कोणकोणत्या प्रक्रिया केल्या जातात.
  • तसेच रानभाज्या सोबतच काही प्रथा व परंपरा देखिल जोडल्या आहेत का? असे विविध पैलू या प्रकल्पाद्वारे विद्यार्थ्यांनी अभ्यासत आपला प्रकल्प सादर केला आहे.
  • प्रकल्पासंदर्भात अभ्यास करताना मुलांनी ज्येष्ठांच्या मुलाखती घेतल्या, प्रत्यक्ष सर्वेक्षण केले, रानभाज्या विषयावरील पुस्तके वाचली तसेच परिसर भेटी देऊन रानभाज्यांच्या अधिवासांचा अभ्यास केला.
  • रानभाज्या अभ्यासकांशी बोलून या अभ्यासाची गरज व व्याप्ती समजून घेतली.
  • रानभाज्या मिळण्याची आताची आणि पुर्वीची स्थिती समजून घेऊन त्यांचं जतन व संवर्धन होण्यासाठी मुलांनी जाणीव- जागृतीचा कार्यक्रम आखायचं काम सुरू केले आहे.

 

या प्रकारचे वैज्ञानिक प्रकल्प करताना मुलं अनेक महत्त्वाचे घटक प्रत्यक्ष अनुभवातून शिकत असतात. मुलं कृती करून शिकत असल्यामुळे शिकण्याचा प्रवास आनंददायी असल्याचे मत प्रकल्पाचे मार्गदर्शक शिक्षक किशोर काठोले मांडतात. तर या प्रकल्पाच्या अभ्यासात विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक रोहिदास पाटील, पदवीधर शिक्षक दत्तात्रेय शिंदे , सहशिक्षक गुरुनाथ आवाटे, रोहिदास वाघ यांनी विशेष मार्गदर्शन केलं आहे.

 

रानभाज्या प्रकल्पाच्या अभ्यासात लोकसंस्कृतीचे महत्व

  • प्रकल्पाच्या अभ्यासात रानभाज्यांचं लोकसंस्कृतीशी जोडलेले महत्व विद्यार्थ्यांना समजून घेता आलं.
  • जसे कुळूची भाजी कुळदैवताला नैवेद्य दाखवून मगच खातात.
  • तसेच काही समाजात तर सासरी गेलेल्या मुलीला माहेरी आणून मग कुळूची भाजी खाल्ली जाते.
  • यासारख्या विविध सांस्कृतिक परंपरा आणि वैशिष्ट्ये प्रकल्पाच्या निमित्ताने समजून घेतानाच विद्यार्थ्यांना ग्रामीण खाद्यसंस्कृती अभ्यासता आल्याने त्यांना वेगळा अनुभव मिळाला.

 

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Moj Zilla Parishad SchoolWild vegetables - A sustainable food sourceरानभाज्या - एक शाश्वत अन्नस्त्रोतराष्ट्रीय बाल विज्ञान परिषद
Previous Post

राज्यात ओमायक्रॉनच्या २३ नव्या रुग्णांचे निदान! तर कोरोनाचे ११७९ नवे रुग्ण, ६१५ रुग्ण बरे!

Next Post

पुण्यात संरक्षण दलांचा बहु-एजेन्सी मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण सराव

Next Post
Defense forces in Pune

पुण्यात संरक्षण दलांचा बहु-एजेन्सी मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण सराव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!