Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अफगाणी मुलीची कविता तालिबानविरूद्ध शस्त्र ठरली! जगभरातील विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी…मी मुलगी का जन्मली?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Afganistan

मुक्तपीठ टीम

बुरसटलेल्या अष्मयुगीन अविचारांनी चालणाऱ्या तालिबानच्या दहशतीमुळे अफगाणिस्तान पुन्हा पिचू लागला आहे. पण त्याचवेळी त्या दहशतीविरोधात शब्दांची शस्त्र उगारली जात आहेत. फरीबा मोहेबी या मुलीची कविता सध्या जगभरात गाजतेय. तिच्या शब्दांनी तालिबानविरोधातील संताप अधिकच पेटतोय तर जगभरातील मुलांसाठी ती कविता प्रेरणादायी ठरतेय.

 

तालिबानने अफगाणिस्तान पूर्णपणे काबीज केले आहे. यामुळे अफगाणिस्तानातील नागरिकांना तालिबान्यांचा जाच सोसावा लागत आहेत. महिलांसाठी तर पार्लर आणि शाळा सर्वच बंद झाले. दरम्यान अफगाणिस्तानातील मावूद येथे राहणाऱ्या फरीबा मोहेबी या विद्यार्थिनीला मुलींसाठी शाळा बंद झाल्याची बातमीने हादरवून सोडले. तिसा इतके दु:ख झाले की, बंद खोलीत ती ढसाढसा रडू लागली. या हताशपणातून ‘मी मुलगी का जन्मली’ ही कविता तिने लिहिली.आज ही कविता अमेरिकन आणि अफगाण विद्यार्थिनींमध्ये प्रेरणा द्यायचे काम करत आहे.

 

फरिबा मोहेबीची कविता

मी मुलगी का जन्माला आले?
मी मुलगा असती तर
मी मुलगी का जन्माला आली?
मुलगी असण्याला महत्वचं नाही काही
ओरडा आणखी ओरडा
एका मुलीला का शिकवायचं?
एका मुलीनं काम का करायचं?
एका मुलीनं स्वतंत्र का राहायचं?

 

अफगाणी मुलीची कविता पसरली जगभर…

  • अफगाणिस्तानातील मावुदपासून १३ हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या अमेरिकेतील कॅनियन क्रेस्ट अकादमीमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे फरीबाची ही कविता दाखवण्यात आली.
  • तिथं असलेल्या अमेरिकन विद्यार्थ्यांना या कवितेतील व्यथाकथनामुळे धक्काच बसला.
  • या कवितेने मावूदच्या विद्यार्थ्यांना आशेचा नवा प्रकाश दाखवला. कॅनियन क्रेस्ट अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मावूद संस्थेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यामुळे अफगाण विद्यार्थिनींना आशेचा नवा प्रकाश मिळाला.
  • अनेक अडचणी असूनही शिक्षण घेण्याचा त्यांचा संकल्प अधिक दृढ होत गेला.

 

अफगाणी विद्यार्थ्यांना आशेचा किरण…

  • मावुदचे प्राचार्य नजीबुल्ला युसेफी यांनी अमेरिकन विद्यार्थ्यांना सांगितले की, “आम्ही जगात एकटे नाही याचा आम्हाला खूप आनंद आहे.
  • जगाच्या दुसऱ्या बाजूला काही चांगली माणसं आहेत,ज्यांना आमची काळजी आहे.
  • अमेरिकन शिक्षक टिमोथी स्टीव्हन आणि युसेफी यांनी ही प्रणाली सुरू केली.
  • फरीबाचीच कविता हा चर्चेचा सुरुवातीचा विषय होता.
  • शालेय मासिकातही ही कविता प्रसिद्ध झाली आहे. यातून शेकडो विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत आहे.
  • १६ वर्षीय फरीबा म्हणाली- अमेरिकन विद्यार्थ्यांनी आम्हाला आमचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरणा दिली आहे.
  • माझी उद्दिष्टे खूप मोठी आहेत.
  • मला कवी आणि कर्करोग संशोधक व्हायचे आहे.

Tags: AfganistanFariba Mohebipoemtalibanअफगाणिस्तानकवितातालिबानफरिबा मोहेबी
Previous Post

हे काय चाललंय? कडक ऊन…कडाक्याची थंडी…अतिवृष्टी! सारंच का टोकाचं? घ्या समजून…

Next Post

कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा कशी आहे वेगळी? सर्वेक्षणातून फरक झाला उघड

Next Post
corona

कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा कशी आहे वेगळी? सर्वेक्षणातून फरक झाला उघड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!