मुक्तपीठ टीम
बुरसटलेल्या अष्मयुगीन अविचारांनी चालणाऱ्या तालिबानच्या दहशतीमुळे अफगाणिस्तान पुन्हा पिचू लागला आहे. पण त्याचवेळी त्या दहशतीविरोधात शब्दांची शस्त्र उगारली जात आहेत. फरीबा मोहेबी या मुलीची कविता सध्या जगभरात गाजतेय. तिच्या शब्दांनी तालिबानविरोधातील संताप अधिकच पेटतोय तर जगभरातील मुलांसाठी ती कविता प्रेरणादायी ठरतेय.
तालिबानने अफगाणिस्तान पूर्णपणे काबीज केले आहे. यामुळे अफगाणिस्तानातील नागरिकांना तालिबान्यांचा जाच सोसावा लागत आहेत. महिलांसाठी तर पार्लर आणि शाळा सर्वच बंद झाले. दरम्यान अफगाणिस्तानातील मावूद येथे राहणाऱ्या फरीबा मोहेबी या विद्यार्थिनीला मुलींसाठी शाळा बंद झाल्याची बातमीने हादरवून सोडले. तिसा इतके दु:ख झाले की, बंद खोलीत ती ढसाढसा रडू लागली. या हताशपणातून ‘मी मुलगी का जन्मली’ ही कविता तिने लिहिली.आज ही कविता अमेरिकन आणि अफगाण विद्यार्थिनींमध्ये प्रेरणा द्यायचे काम करत आहे.
फरिबा मोहेबीची कविता
मी मुलगी का जन्माला आले?
मी मुलगा असती तर
मी मुलगी का जन्माला आली?
मुलगी असण्याला महत्वचं नाही काही
ओरडा आणखी ओरडा
एका मुलीला का शिकवायचं?
एका मुलीनं काम का करायचं?
एका मुलीनं स्वतंत्र का राहायचं?
अफगाणी मुलीची कविता पसरली जगभर…
- अफगाणिस्तानातील मावुदपासून १३ हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या अमेरिकेतील कॅनियन क्रेस्ट अकादमीमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे फरीबाची ही कविता दाखवण्यात आली.
- तिथं असलेल्या अमेरिकन विद्यार्थ्यांना या कवितेतील व्यथाकथनामुळे धक्काच बसला.
- या कवितेने मावूदच्या विद्यार्थ्यांना आशेचा नवा प्रकाश दाखवला. कॅनियन क्रेस्ट अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मावूद संस्थेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यामुळे अफगाण विद्यार्थिनींना आशेचा नवा प्रकाश मिळाला.
- अनेक अडचणी असूनही शिक्षण घेण्याचा त्यांचा संकल्प अधिक दृढ होत गेला.
अफगाणी विद्यार्थ्यांना आशेचा किरण…
- मावुदचे प्राचार्य नजीबुल्ला युसेफी यांनी अमेरिकन विद्यार्थ्यांना सांगितले की, “आम्ही जगात एकटे नाही याचा आम्हाला खूप आनंद आहे.
- जगाच्या दुसऱ्या बाजूला काही चांगली माणसं आहेत,ज्यांना आमची काळजी आहे.
- अमेरिकन शिक्षक टिमोथी स्टीव्हन आणि युसेफी यांनी ही प्रणाली सुरू केली.
- फरीबाचीच कविता हा चर्चेचा सुरुवातीचा विषय होता.
- शालेय मासिकातही ही कविता प्रसिद्ध झाली आहे. यातून शेकडो विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत आहे.
- १६ वर्षीय फरीबा म्हणाली- अमेरिकन विद्यार्थ्यांनी आम्हाला आमचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरणा दिली आहे.
- माझी उद्दिष्टे खूप मोठी आहेत.
- मला कवी आणि कर्करोग संशोधक व्हायचे आहे.