मुक्तपीठ टीम
दरवर्षी भारतात ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आपले माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचाही आहे. यामुळेच दरवर्षी हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरी केला जातो. प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्वाची आणि विशेष असते. मुलाला यशस्वी आणि उत्तम व्यक्ती बनवण्यासाठी शिक्षक खूप महत्वाची भूमिका बजावतो. या दिवशी शाळेत आणि महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. विद्यार्थी आपापल्या परीने शिक्षकांबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करतात. शिक्षक दिनाचा इतिहास काय आहे आणि तो भारतात कधीपासून साजरा केला जातो हे जाणून घेऊया.
शिक्षक दिन का साजरा केला जातो?
- माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस (५ सप्टेंबर) दरवर्षी भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
- डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे शिक्षक होते तसेच स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते.
- त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांकडे त्यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी आपल्या आयुष्यातील चाळीस वर्षे शिक्षक म्हणून भारताचे भविष्य सुधारण्यात घालवले.
- सर्वपल्ली राधाकृष्णन यांना २७ वेळा नोबेल पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले.
- १९५४ मध्ये त्यांना भारतरत्न प्रदान करण्यात आले.
- देशभरात शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा १९६२ साली सुरू झाली.
- डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या विद्यार्थ्यांनी यासाठी त्यांची मान्यता घेतली होती.
- तेव्हा डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणाले होते की माझा वाढदिवस साजरा करण्याऐवजी हा दिवस शिक्षकांच्या सन्मानार्थ साजरा करावा.
- मग त्यांनी स्वतः शिक्षकांच्या सन्मानार्थ या दिवशी शिक्षक दिन साजरा करण्याची सूचना केली.
- डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणायचे की संपूर्ण जग एक शाळा आहे, जिथे आपण काही ना काही शिकत राहतो.
कोण होते डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन?
- डॉ राधाकृष्णन यांचा जन्म १८८८ साली तामिळनाडूच्या तिरुत्तानी नावाच्या गावात झाला.
- डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले.
- कृष्णन लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होते. गरिबीतही ते अभ्यासात मागे राहिले नाहीत आणि फिलॉसोफीमध्ये एमए केले.
- त्यानंतर १९१६ मध्ये त्यांनी मद्रास रेसिडेन्सी कॉलेजमध्ये फिलॉसोफीचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले.
- त्यानंतर काही वर्षांनी प्राध्यापक झाले.
- देशातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना घडवण्यात सहभाग घेतला.
- कोलंबो आणि लंडन विद्यापीठानेही डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांना मानक पदवी देऊन सन्मानित केले.
- ते १९४९-१९५२ पर्यंत मॉस्कोमध्ये भारताचे राजदूत होते आणि १९५२ मध्ये त्यांची भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपतीपदही भुषवले.
- नंतर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शिक्षक दिनाचे महत्त्वच वेगळे…
- शिक्षक दिनी विद्यार्थी आपल्या शिक्षकाचा सन्मान करण्यासाठी उत्सुक असतात.
- हा दिवस विद्यार्थ्यांसाठी खास आहे.
- विद्यार्थी शिक्षकांनी त्यांचे भविष्य घडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांचे आभार मानतात.
- शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी शिक्षकांना भेटवस्तू देतात आणि त्यांच्यासाठी विशेष सन्मान समारंभ आयोजित करतात.