Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वीस वर्षांनंतर विदर्भातील नेत्याने शिवसेना सोडत का धरली राष्ट्रवादीची वाट?

याआधीही माजी आमदार अशोक शिंदेंनी शिवबंधन तोडत धरला काँग्रेसचा हात!

August 31, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
sawarbandhe

मुक्तपीठ टीम

एकीकडे भाजपासोबत युती तोडून शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडी सरकार बनवून सत्तेत आले. मात्र तरीही दुसरीकडे चित्र मात्र वेगळेचं दिसतं आहे. शिवसेनेतील अनेक जुने नेते नाराज असून आघाडीतील शिवसेनेच्या मित्र पक्षांमध्ये जात आहेत. मराठी माणसांच्या हिताचा मूळ उद्देश असणाऱ्या शिवसेनेवर हिंदी भाषिकांचा कब्जा होत असल्याचा आरोप केला जात आहे. शिवसेनेचे नागपूरमधील माजी उपमहापौर व माजी जिल्हाप्रमुख शेखर सावरबंधे यांनी शिवसेनेला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे विदर्भातील आधीच कमकुवत असलेल्या शिवसेनेला धक्का बसल्याचे मानले जाते.

 

गेल्या काही दिवसांपासून नागपुरातील अनेक जुन्या शिवसैनिकांनी पक्षांतर केले आहे. त्यात नागपूर मनपाची निवडणूक तोंडावर असताना सावरबांधे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने पक्षात खळबळ माजली आहे. नागपुरातील शिवसेनेत असलेल्या असंतोषाची कारणं मुंबईहून मागवल्याची माहिती मिळत आहे. तर शिवसेनेच्या एका माजी पदाधिकाऱ्याला तातडीने मुंबईत बोलावणं आल्याचीही माहिती आहे.

 

शिवसेनेत दोन दशके घालवलेल्या शेखर सावरबांधेंना शिवसेना का झाली नकोशी?

  • शेखर सावरबांधे हे नागपूरचे माजी उपमहापौर आहेत.
  • शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांचे विश्वासू मानले जातात.
  • विदर्भातल्या शिवसेनेवर त्यांची मजबूत पकड होती.
  • शिवसेना सोडताना त्यांनी व्यक्त केलेली व्यथा महत्वाची मानली जाते.
  • परंतु “आपले नेते खा. गजानन कीर्तिकर यांच्या शब्दाला निर्णय प्रक्रियेत स्थान नाही, मग आपण सेनेत राहून काय करायचं?
  • शिवसेनेत बाहेरुन आलेल्यांना संधी दिली जात आहे, पण जुन्या शिवसैनिकांना डावललं जातंय.
  • मी जवळपास २० वर्षे शिवसेनेत राहिलो.
  • पण आता पक्षाचं चित्र पाहता सेनेत राहणं शक्य नाही.

 

सेना नेतृत्वाचे विदर्भाकडे दुर्लक्ष, शिवसेनेला दुसरा धक्का!

  • शिवसेना पक्षनेतृत्वाकडून विदर्भाकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही, असा स्थानिक शिवसैनिकांचा नेहमीच आरोप असतो.
  • गेल्या महिन्यात अशोक शिंदे यांनी शिवसेनासोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.
  • आता शेखर सावरबांधे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
  • विदर्भात तसाही शिवसेनेचा फारसा प्रभाव नाही, अशातच सावरबांधे यांच्या शिवबंधन तोडून राष्ट्रवादी प्रवेशाने ऐन मनपा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला धक्का बसल्याचे मानले जाते.
  • आता शिवसेना नेतृत्वाने स्थानिक पदाधिकाऱ्यांना पाचरण करून माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.

Tags: Ashok ShindenagpurNCPShekhar SawarbandheShivsenaअशोक शिंदेनागपुरराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनाशेखर सावरबंधे
Previous Post

भारतीय लष्कराच्या एएससी सेंटरमध्ये ४०० जागांसाठी भरती

Next Post

पंचायतींना पाणी आणि स्वच्छतेसाठी १ लाख ४२ हजार कोटी, महाराष्ट्राला १३ हजार ६२८ कोटी!

Next Post
panchayats

पंचायतींना पाणी आणि स्वच्छतेसाठी १ लाख ४२ हजार कोटी, महाराष्ट्राला १३ हजार ६२८ कोटी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!