Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संजय राऊत अटक, गांधी आक्रमक, पण पवार शांत…असं कसं?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sanjay Raut and Sharad Pawar

मुक्तपीठ टीम

शिवसेना खासदार संजय राऊत यांचा ईडी कोठडीतला मुक्काम ८ ऑगस्टपर्यंत वाढला आहे. तर त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स बजावलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी राऊतांविरोधातील ईडी कारवाईविरोधात जोरदार आवाज उठवला आहे. पण संजय राऊतांवर ज्यांच्याशी असलेल्या अतिजवळीकीमुळे सातत्यानं शिवसेनेतूनही टीका होते, त्या शरद पवार मात्र तुलनेत खूप शांत असल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्याचवेळी पवारसाहेब जास्त बोलत नाही याचा अर्थ ते राऊतांसाठी त्यांच्या डोक्यात नक्कीच काही असावं, ते काही करत असावेत, असा दावा एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने म्हटलं.

संजय राऊतांना गांधी परिवारांकडून समर्थन!!

  • संजय राऊतांना अटक झाली त्याच दिवशी राहुल गांधीनी ट्वीट करत त्या घटनेचा निषेध केला होता.
  • तर प्रियांका गांधी यांनी ट्वीट करत संजय राऊतांना पाठिंबा दर्शवत भाजपावर घणाघाती टीका केली आहे.
  • “धमक्या, कपट, फसवेगिरी करून सत्ता बळकावणं आणि लोकशाही चिरडणं हे भाजपाचं एकमेव ध्येय आहे.
  • संजय राऊत भाजपच्या फसव्या राजकारणाला घाबरत नसून भाजपाला तोंडघशी पाडल्यानं त्यांच्या कुटुंबावर हल्ला झाला आहे”, असं ट्वीट प्रियांका गांधी केले आहे.
  • संजय राऊतांच्या अटकेवरुन राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
  • राजाचा संदेश स्पष्ट आहे, जो माझ्या विरोधात बोलेल त्याला त्रास सहन करावा लागेल. सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करुन विरोधकांचं धैर्य तोडणं आणि सत्याचा आवाज बंद करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, हुकूमशाहनं हे लक्षात घ्यावं शेवटी सत्याचा विजय होईल आणि अहंकार पराभूत होईल, असं राहुल गांधी म्हणाले.

संजय राऊतांमागील ईडीपिडेवर शरद पवार का शांत?

  • संजय राऊत यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांनी ना प्रसार माध्यमांपुढे ना सोशल मीडियावर आपली आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
  • त्यांनी धुळे, दिल्लीत काहीसं भाष्य केलं, असं सांगितलं जातं. पण ते तेवढेसे आक्रमक दिसलेच नाहीत.
  • खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत राज्यसभेत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला.
  • तरीही शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस संजय राऊतांच्या अटकेप्रकरणी म्हणावे तेवढे आक्रमक दिसलेच नाहीत, उलट शांतच असल्याचं जाणवले.
  • एकंदरीतच ज्या पक्षाचे शुभचिंतक असल्याचा आरोप शिवसेनेतूनही संजय राऊतांवर सातत्यानं होत राहिला, विरोधातील भाजपाच नाही तर सोबतची काँग्रेसही ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत का, अशी टीका होत राहिली, त्याच राष्ट्रवादीकडून म्हणावी तशी आक्रमक भूमिका का मांडली जात नसावी, अशी चर्चा सुरु झाली आहे.
  • विशेषत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसारखाच शरद पवार यांच्याविषयी मनात आदरभाव असल्याचं जाहीर सांगणाऱ्या संजय राऊतांवर ईडी कारवाई झाली असताना शरद पवार यांनी खूपच शांत राहणं आश्चर्यकारक मानलं जात आहे.
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने मुक्तपीठशी बोलताना शरद पवार हे बोलत नसतात, ते करून दाखवतात, असं म्हटलं. ते बोलत नाहीत, याचा अर्थ त्यांचं राऊतांसाठी काही वेगळे प्रयत्न सुरु असतील, असे ते म्हणाले.

Tags: EDNCPPatrachawl Scampriyanka gandhirahul gandhisanjay rautsharad pawarईडीपत्राचाळ घोटाळाप्रियंका गांधीराष्ट्रवादी काँग्रेसराहुल गांधीशरद पवारसंजय राऊत
Previous Post

‘नंदनवन’ सोडून मुख्यमंत्री शिंदे अखेर ‘वर्षा’वर जाणार…नावाची पाटी झळकली!

Next Post

#मुक्तपीठ #LiVE ‘घरोघरी तिरंगा’वरून भाजपाचा हल्लाबोल: “नाव राष्ट्रवादी, भूमिका राष्ट्रद्वेषी!”

Next Post
#मुक्तपीठ #LiVE  ‘घरोघरी तिरंगा’वरून भाजपाचा हल्लाबोल: “नाव राष्ट्रवादी, भूमिका राष्ट्रद्वेषी!”

#मुक्तपीठ #LiVE 'घरोघरी तिरंगा'वरून भाजपाचा हल्लाबोल: "नाव राष्ट्रवादी, भूमिका राष्ट्रद्वेषी!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!