Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुजरात निवडणूक: सत्तेच्या समीकरणात महत्वाचे का आहेत पाटीदार?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
patidar-vote-importance-in-gujarat Election

मुक्तपीठ टीम

पाटीदार ही भारतातील परंपरागतपणे जमीनदार आणि शेती करणारी जात आहे. गुजरात राज्यातील प्रबळ जातींपैकी एक ही जात आहे. गुजरातमध्ये प्रत्येक राजकीय पक्षासाठी पाटीदार मते महत्त्वाची आहेत. गुजरातमध्ये पाटीदारांना १८ ते १९ टक्के मते आहेत. गुजरात विधानसभेच्या ४० जागांवर पाटीदार मतदारांचा थेट प्रभाव आहे. राज्यात झालेल्या पाटीदार आंदोलनाचा फटका २०१७ मध्ये भाजपला सहन करावा लागला होता. यावेळी मात्र चित्र वेगळे आहे. पाटीदार आंदोलनाचा प्रमुख चेहरा हार्दिक पटेल आता स्वतः भाजपात आहेत. अशा स्थितीत या निवडणुकीत भाजपाला पाटीदार मते मिळणार की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

गुजरातमध्ये भाजपाला पाटीदारांची मते मिळणार का?

  • २०२२ च्या निवडणुकीत भाजपाला पाटीदारांची मते मिळणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
  • २०१५ मध्ये पाटीदार आंदोलन सुरू झाले आणि यादरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला.
  • या आंदोलनाने गुजरातला हार्दिक पटेल हा नवा नेता दिला.
  • मात्र, हार्दिक पटेल यांनी नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ते आता भाजपमध्ये आहे.
  • वास्तविक, प्रत्येक समीकरण वेगवेगळ्या पद्धतीने भाजपा आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत आहे.
  • पाटीदार आंदोलनानंतर हा समाज भाजपपासून दुरावला होता.
  • तर एकेकाळी हा समाज पक्षाचा पारंपरिक मतदार होता.
  • त्याचा परिणाम २०१७ च्या निवडणुकीतही दिसून आला आणि भाजपाला काँग्रेसकडून कडवी झुंज मिळाली.
  • २०१७ च्या निवडणुकीत भाजपने ९९ जागा जिंकल्या होत्या, जरी दावा १५० होता.
  • पण, यावेळी परिस्थिती बदलली आहे.
  • गेल्या निवडणुकीत मजबूत असलेली काँग्रेस यावेळी विखुरलेली दिसत आहे.
  • निकाल आपल्या बाजूने यावा यासाठी भाजपाचे सर्व प्रयत्न सुरू असून त्यासाठी पाटीदार समाजाला आपल्या बाजूने करण्यासाठी विशेष रणनीती अवलंबली जात आहे.
  • यावेळी स्वतः हार्दिक पटेलही भाजपमध्ये आहेत.
  • अशा परिस्थितीत यावेळी परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे.

‘आप’ची नजर पाटीदार समाजाच्या व्होटबँकेवर

  • या सर्व परिस्थितीत आम आदमी पक्षाच्या या निवडणुकीत प्रवेशामुळे गुजरातमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
  • निवडणुकीच्या रणधुमाळीत आम आदमी पक्षाच्या प्रवेशाने भाजपासह काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
  • गुजरातमध्येही आम आदमी पक्षाची नजर पाटीदार मतांवर असल्याचे सांगण्यात येत आहे.
  • हे पाहता पक्षाची कमान गोपाल इटालिया यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
  • वास्तविक, गोपाल इटालिया हे पाटीदार समाजातील आहेत.
  • अरविंद केजरीवाल यांच्यासाठी दिलासा देणारी बाब म्हणजे गेल्या वर्षी सूरतच्या नगरपालिका निवडणुकीत २७ जागा आम आदमी पक्षाच्या खात्यात गेल्या होत्या.
  • अशा परिस्थितीत ‘आप’ हे भाजपसमोर नवे आव्हान आहे.
  • पाटीदार समाजाची मते आपल्या बाजूने असतील अशी भाजपाला आशा आहे.

Tags: aapBJPCongressgujratGujrat Assembly ElectionPatidar Casteआपकाँग्रेसगुजरातगुजरात विधानसभा निवडणूकपाटीदार समाजभाजपा
Previous Post

पिंपरी-चिंचवडमध्ये मिळकतकर वसुलीसाठी कार, फ्रीज, टीव्ही जप्त करण्याचा निर्णय!

Next Post

पायाभूत सुविधा पुरवितानाच कोळीवाड्यांचे सुशोभीकरण करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
cm eknath shinde

पायाभूत सुविधा पुरवितानाच कोळीवाड्यांचे सुशोभीकरण करावे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!