मुक्तपीठ टीम
पाटीदार ही भारतातील परंपरागतपणे जमीनदार आणि शेती करणारी जात आहे. गुजरात राज्यातील प्रबळ जातींपैकी एक ही जात आहे. गुजरातमध्ये प्रत्येक राजकीय पक्षासाठी पाटीदार मते महत्त्वाची आहेत. गुजरातमध्ये पाटीदारांना १८ ते १९ टक्के मते आहेत. गुजरात विधानसभेच्या ४० जागांवर पाटीदार मतदारांचा थेट प्रभाव आहे. राज्यात झालेल्या पाटीदार आंदोलनाचा फटका २०१७ मध्ये भाजपला सहन करावा लागला होता. यावेळी मात्र चित्र वेगळे आहे. पाटीदार आंदोलनाचा प्रमुख चेहरा हार्दिक पटेल आता स्वतः भाजपात आहेत. अशा स्थितीत या निवडणुकीत भाजपाला पाटीदार मते मिळणार की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
गुजरातमध्ये भाजपाला पाटीदारांची मते मिळणार का?
- २०२२ च्या निवडणुकीत भाजपाला पाटीदारांची मते मिळणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
- २०१५ मध्ये पाटीदार आंदोलन सुरू झाले आणि यादरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला.
- या आंदोलनाने गुजरातला हार्दिक पटेल हा नवा नेता दिला.
- मात्र, हार्दिक पटेल यांनी नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ते आता भाजपमध्ये आहे.
- वास्तविक, प्रत्येक समीकरण वेगवेगळ्या पद्धतीने भाजपा आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत आहे.
- पाटीदार आंदोलनानंतर हा समाज भाजपपासून दुरावला होता.
- तर एकेकाळी हा समाज पक्षाचा पारंपरिक मतदार होता.
- त्याचा परिणाम २०१७ च्या निवडणुकीतही दिसून आला आणि भाजपाला काँग्रेसकडून कडवी झुंज मिळाली.
- २०१७ च्या निवडणुकीत भाजपने ९९ जागा जिंकल्या होत्या, जरी दावा १५० होता.
- पण, यावेळी परिस्थिती बदलली आहे.
- गेल्या निवडणुकीत मजबूत असलेली काँग्रेस यावेळी विखुरलेली दिसत आहे.
- निकाल आपल्या बाजूने यावा यासाठी भाजपाचे सर्व प्रयत्न सुरू असून त्यासाठी पाटीदार समाजाला आपल्या बाजूने करण्यासाठी विशेष रणनीती अवलंबली जात आहे.
- यावेळी स्वतः हार्दिक पटेलही भाजपमध्ये आहेत.
- अशा परिस्थितीत यावेळी परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे.
‘आप’ची नजर पाटीदार समाजाच्या व्होटबँकेवर
- या सर्व परिस्थितीत आम आदमी पक्षाच्या या निवडणुकीत प्रवेशामुळे गुजरातमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
- निवडणुकीच्या रणधुमाळीत आम आदमी पक्षाच्या प्रवेशाने भाजपासह काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
- गुजरातमध्येही आम आदमी पक्षाची नजर पाटीदार मतांवर असल्याचे सांगण्यात येत आहे.
- हे पाहता पक्षाची कमान गोपाल इटालिया यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
- वास्तविक, गोपाल इटालिया हे पाटीदार समाजातील आहेत.
- अरविंद केजरीवाल यांच्यासाठी दिलासा देणारी बाब म्हणजे गेल्या वर्षी सूरतच्या नगरपालिका निवडणुकीत २७ जागा आम आदमी पक्षाच्या खात्यात गेल्या होत्या.
- अशा परिस्थितीत ‘आप’ हे भाजपसमोर नवे आव्हान आहे.
- पाटीदार समाजाची मते आपल्या बाजूने असतील अशी भाजपाला आशा आहे.