मुक्तपीठ टीम
द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी आझम खान यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची आमदारकीही गेली आहे. कोर्टाकडून शिक्षेची घोषणा झाल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्यातही रजा मुराद आणि जयाप्रदांची प्रतिक्रिया लक्षवेधी आहे.
देशात द्वेषपूर्ण भाषणे देणाऱ्या सर्व नेत्यांवर कारवाई व्हायला हवी!
- सर्व नेत्यांनी यापासून धडा घेतला पाहिजे.
- द्वेषपूर्ण वक्तव्ये करणाऱ्या सर्व नेत्यांवर कारवाई केली पाहिजे.
- आझम खान दहा वेळा आमदार राहिले असतील तर जनतेचा पाठिंबा नक्कीच असावा.
- आझम खान यांनी काय भाषण केले त्याची त्यांना कल्पना नाही.
- देशातील वरिष्ठ न्यायालयांचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले आहेत.
- न्यायालयाने त्यांच्यावर अन्याय केला आहे असे त्यांना वाटत असेल तर ते उच्च न्यायालयालात जाऊ शकतात.
- देशात द्वेष पसरवणारी भाषणे देणाऱ्या इतर अनेक नेत्यांवर कारवाई व्हायला हवी.
- कायदा सर्वांना समान असावा.
- या देशात सर्वांना न्याय मिळतो.
- द्वेषपूर्ण भाषणे देणाऱ्या सर्व नेत्यांवर अशाच पद्धतीने कारवाई झाली पाहिजे.
आझम खान यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा झाली: जया प्रदा
- आझम खान यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे.
- त्यांची आमदारकी हिसकावून घेतली आहे.
- राजकारणात एकमेकांबद्दल मतभिन्नता असते, परंतु सत्तेचा अंंहकार कधीही नसावा.
- असा अंहकार जो तुम्हाला स्त्रियांचा आदर करायला विसरवतो, गरीब आणि दीनांवर अन्याय करायला लावतो.
- माणूस कितीही मोठा असला तरी त्याचा अंहकार एक दिवस नक्कीच भंगतो.
- आज आझम खान यांचा अंहकार भंगला आहे.
- अभिमानामुळे त्यांना आज हा दिवस पहावा लागतो.
- २०१९ मध्ये रामपूरमधून लोकसभा निवडणूक लढवत असताना आझम खान यांनी माझ्याबद्दल असभ्य टिप्पणी करून माझा अपमान केला होता.
- मला त्याचा खूप त्रास झाला.
- आजही तो काळ आठवून थरथर कापते.
- त्यावेळी आझम खान यांना आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला असता, तर त्यांना आज हा दिवस दिसला नसता.