Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अफगाणिस्तानात तालिबानी इस्लामी कट्टरपंथी राजवट येऊनही ‘‘इसिस-के’’ने का घडवले भीषण स्फोट?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Afghanistan

मुक्तपीठ टीम

अमेरिका अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यानंतर तालिबानचीच सत्ता असेल असे मानले जात होते, पण २६ ऑगस्ट रोजी काबूलमध्ये झालेल्या हल्ल्याने तसं मानणं योग्य नसल्याचं उघड झालं आहे. या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट अफगाणिस्तान आणि पाकिस्तान शाखा इसिस-खोरासान म्हणजेच ‘इसिस-के’ यांनी स्वीकारली आहे. त्यामुळे तालिबानसारखी इस्लामी कट्टरतावादी राजवट असूनही ‘इसिस-के’ एवढा भीषण हिंसाचार का घडवत आहे, असा प्रश्न समोर आला आहे. दोन इस्लामी कट्टरपंथीयांमधील रक्तरंजित संघर्षामागील कारणं समजून घेणे आवश्यक आहे.

 

या हल्ल्यानंतर तज्ज्ञ सांगत आहेत की अल कायदा आणि इसिस-के सारख्या दहशतवादी संघटनांशी युद्ध आणखी वाढू शकते. या गटांमध्ये पिढीजात आणि सैद्धांतिक विभागणी आहे. अलिकडच्या वर्षांत इस्लामिक स्टेट दहशतवाद्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाला आहे कारण इराक आणि सीरियामध्ये काही दिवसांच्या अतिरेकी संघांची स्थापना करण्यात यश आले आहे.

 

‘इसिस-के’ तालिबानला कमकुवत करेल का?

  • अफगाणिस्तानातून अमेरिका बाहेर पडल्यामुळे आता ‘इसिस-के’ आपला स्थानिक स्पर्धक तालिबानला कमकुवत करण्यावर लक्ष केंद्रित करू शकते.
  • ‘इसिस-के’चे लक्ष्य सध्या अफगाणिस्तानात राजकीयदृष्ट्या सत्ता स्थापना प्रक्रियेत दखलपात्र राहणे हे असू शकते.
  • ‘इसिस-के’ तालिबानची सत्ता अफगाणिस्तानात स्थिर होण्यापासून रोखण्यासाठी वाट्टेल ते करू शकते.
    त्यामुळे ‘इसिस-के’ तालीबानची विश्वासार्हता कमी करण्यासाठी घातपातावर भर देत राहू शकते.
  • अमेरिका आणि युरोपमधील अनेक देशांनी काबूल विमानतळाजवळ हल्ल्याचा इशारा दिला होता.
  • लोकांना विमानतळापासून दूर राहण्यास सांगितले होते.
  • ही गुप्तचर माहिती मिळाल्यानंतरही ‘इसिस-के’ काबूल विमानतळावर हल्ला करण्यात यशस्वी ठरले आहे.

 

तालिबानला कमकुवत ठरवण्यासाठी ‘इसिस-के’चा हिंसाचार?

  • वॉशिंग्टन पोस्टने असे वृत्त दिले आहे की तालिबानने काबूल ताब्यात घेण्यापूर्वीच अमेरिकेचे सुरक्षा अधिकारी अफगाणिस्तानमध्ये ‘इसिस-के’ च्या वाढत्या प्रभावाबद्दल चिंतित होते.
  • ‘इसिस-के’ ने राजकीय अस्थिरतेचा फायदा घेत हिंसाचार वाढवल्या अशाही बातम्या होत्या.
  • एका अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते अमेरिकन सैनिक आणि तालिबान दोघेही हल्ल्याचे लक्ष्य होते.
  • या हल्ल्यात सामान्य लोकांबरोबरच अमेरिकन सैनिक आणि अनेक तालिबान लढाऊही मारले गेले आहेत.
  • संयुक्त राष्ट्र संघाचा असा अंदाज आहे की अफगाणिस्तानच्या कोनार आणि नानहार प्रांतांमध्ये १५००-२००० ‘इसिस-के’ लढाऊंचा मुख्य गट आहे.
  • २०२१ च्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात ४७ हल्ले झाले.
  • २०१७ मध्ये या गटाने १०० हल्ल्यांची आणि २०१८ मध्ये ८४ हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली.

 

तालिबान दोन आघाड्यांवर कसे लढणार?

  • काबूल हल्ल्याबाबत तज्ज्ञांचे मत आहे की या हल्ल्याने तालिबान कमकुवत असल्याचे सिद्ध झाले आहे.
  • असे आणखी हल्ले तालिबानला कमकुवत करत राहतील.
  • ‘इसिस-के’ला चांगलेच माहीत आहे की तालिबान दोन आघाड्यांवर युद्ध लढण्याच्या स्थितीत नाही.
  • ‘इसिस-के’ आपला प्रभाव वाढवण्यासाठी तालिबान आणि अमेरिका यांच्यातील संवादच संपवण्याचा प्रयत्न करत आहे.

 

तालिबान काय करणार?

  • तालिबान आयएसआयएस-के सेनानींना त्यांच्या गटात पुन्हा सामील होण्यासाठी प्रयत्न करत आहे.
  • तालिबानसाठी हे अत्यंत कठीण ठरू शकते.
  • अशा परिस्थितीत, येत्या काळात तालिबान आणि ‘इसिस-के’ मध्ये भीषण युद्ध घडण्याची भीती आहे.

Tags: Afghanistankabul airport blasttalibanइसिस-के
Previous Post

“महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक उद्धव ठाकरे!”

Next Post

कोळी समाजाच्या नजरेतून मुंबईच्या काल-आज-उद्याचे डिजिटल प्रतिबिंब

Next Post
koli

कोळी समाजाच्या नजरेतून मुंबईच्या काल-आज-उद्याचे डिजिटल प्रतिबिंब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!