Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“कोरोनावर सर्जिकल स्ट्राईक करा…सर्वच राज्यांमध्ये घरोघरी लसीकरण का नाही?”

मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्न

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Mumbai high court

मुक्तपीठ टीम

कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटे दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. सध्या कोरोना समाजाचा सर्वात मोठा शत्रू आहे. केंद्र सरकारने या शत्रूवर सर्जिकल स्ट्राईक सारखी कारवाई करायला हवी, अशी सूचना उच्च न्यायालयाने दिली आहे. सीमेवर उभे राहून विषाणूंचा हल्ला होईपर्यंत वाट पाहात बसू नका, असेही उच्च न्यायालयाने बुधवारी सांगितले. तसेच देशातील काही राज्यांमध्ये घरोघरी लसीकरण होते, तर मग सर्वच राज्यांमध्ये घरोघरी लसीकरण का नाही, असा प्रश्नही न्यायालयाने विचारला.

 

याचिकाकर्ते अॅड. धृती कपाडिया आणि अॅड. कुणाल तिवारी यांनी आपल्या याचिकेत न्यायालयाकडून सरकारला ७५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांना घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम सुरू करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. मुख्य न्यायाधीश दीपनकर दत्ता आणि न्यायमूर्ती जीएस कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले की सरकारचे नवीन धोरण म्हणजे विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीची लसीकरण केंद्रात वाट पाहत बसण्यासारखे आहे.

 

कोरोनावर सर्जिकल स्ट्राइक करा!

• कोरोना हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे.
• त्याला आपल्याला हरवायला हवं.
• हा शत्रू काही भागात लपून बसला आहे आणि काही लोकांना घराबाहेर पडताही येत नाही.
• सरकारची भूमिका ही सर्जिकल स्ट्राइक सारखीच असावी.

लोकहितासाठी निर्णय, पण उशीरामुळे अनेकांचे प्राण गेले

• तुम्ही सीमेवर बसून विषाणूंचा हल्ला होण्याची वाट पाहात आहात. खरतर तुम्ही या बाबतीत शत्रूच्या प्रदेशात जाऊन कारवाई करायला हवी.
• सरकार लोकांच्या हितासाठी निर्णय घेत आहे परंतु त्यांची अंमलबजावणी करण्यास विलंब झाला, यामुळे अनेकांचे प्राण गेले.

 

घरोघरी नाही घराच्या जवळ!

• केंद्र सरकारने न्यायालयाला सांगितले होते की सध्या घरोघरी लसीकरण करणे शक्य नाही .
• आम्ही ‘घराच्या जवळ’ लसीकरण मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
• केरळ, जम्मू-काश्मीर, बिहार आणि ओडिशासारख्या राज्यात घरोघरी जाऊन लसीकरण सुरू आहे, मग देशातील सर्व राज्यात असे का होऊ शकत नाही, असा सवाल न्यायालयाने विचारला आहे.


Tags: coronaprime minister narendra modiअॅड. कुणाल तिवारीअॅड. धृती कपाडियाकेंद्र सरकारकोरोनामुंबई उच्च न्यायालय
Previous Post

“महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे कृषी सुधारणा विधेयक”

Next Post

तन्मय फडणवीस: ट्विटरवर अभिनेता, लसीसाठी आरोग्य कर्मचारी!!

Next Post
tanmay fadanvis

तन्मय फडणवीस: ट्विटरवर अभिनेता, लसीसाठी आरोग्य कर्मचारी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!