मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील मुंबई ते नागपूर अंतर वेगानं पार पाडण्याची संधी देणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाबद्दल कमालीची उत्सुकता आहे. या महामार्गाच्या नागपूर ते शेलू बाजार दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण २ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होते. पण ते उद्घाटन पुढे ढकलण्यात आले आहे. त्यासाठी MSRDCने आज निवेदन जारी केले आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ MSRDCचे निवेदन
- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या १५ व्या किलोमीटरमध्ये वन्यजीव उन्नत मार्गाचे (Wild life over pass) काम प्रगतीपथावर आहे.
- या उन्नत मार्गाचे सुपर स्ट्रक्चर हे आर्च पध्दतीचे आहे. हे काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.
- सदर काम अंतिम टप्यात असताना त्यातील १०५ पैकी काही Arch Strips ला अपघाताने हानी पोहचली आहे.
- तज्ज्ञांसोबत पाहणी आणि चर्चा करुन नवीन पध्दतीचे सुपर स्ट्रक्चर बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- हे काम दीड महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होईल.
उद्घाटन आता दीड महिन्यांनंतरच!
- वन्यजीव उन्नत मार्ग पूर्ण झाल्याशिवाय महामार्ग वाहतुकीसाठी खुला करता येणार नाही.
- त्यामुळे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या नागपूर ते शेलू बाजार दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पुढे ढकलण्यात आले आहे.