Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मोदी सरकार मराठीला अभिजात दर्जा का देत नाहीये?

प्रा. हरी नरके यांचा शब्दात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यास विलंब का?

March 1, 2022
in घडलं-बिघडलं, व्हा अभिव्यक्त!
0
marathi Language

प्रा. हरी नरके

मराठी भाषा गौरव दिनी अभिजात दर्जाची घोषणा होईल अशी अपेक्षा होती. ती फोल ठरली. हा दर्जा गेली सात वर्षे नी २२ दिवस सतत हुलकावणी देत आलाय. असे का होत असावे?

  • हा दर्जा मिळवण्याचे प्रामाणिक प्रयत्न उद्धव ठाकरे सरकारने प्रथमच केले. त्याआधीचे फडणवीस सरकार निव्वळ बोलघेवडे होते, त्यांच्या ५ वर्षात हा दर्जा मिळवण्यासाठी काहीही केले गेले नाही, हे या उपक्रमाचा सुरुवाती पासूनचा साक्षीदार असल्याने मला माहित आहे. विनोद तावडे तर याबद्दल दिल्लीत तोंडही उघडत नसत. ते नी फडणवीस गुज्जू लॉबीचे आश्रित असल्याने त्यांनी मराठीचा कायम बळी दिला. त्यांनी ही मागणी कधीही केलीच नाही. या दोघांमुळे मराठीची ५ वर्षे सपशेल वाया गेली.
  • ठाकरे-पवारांनी प्रथमच ही मागणी प्रधानमंत्री मोदी यांना प्रत्यक्ष भेटून केली.
  • तीचा प्रभावी पाठपुरावा मराठी भाषा विभागाचे कार्यक्षम मंत्री सुभाष देसाई यांनी केला.
  • “शांतता! मराठीचे कोर्ट चालू आहे” हा लघुपट तयार करून मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात आली.
  • अभिजात मराठी चे दालन उभारून नाशिकच्या ९४ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनात लोकांना हा विषय समजावून सांगण्यात आला. हेच प्रदर्शन पुढे विधानभवनात नी मंत्रालयात भरवून मंत्री,आमदार व अधिकारी यांचे याबाबत प्रशिक्षण करण्यात आले. त्याला भरीव प्रतिसाद मिळाला.भाजप वगळता सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी याला भेटी दिल्या.भाजपवाले तिकडे फिरकलेसुद्धा नाहीत.
  • यावर्षीच्या दिनदर्शिकेसाठी (कॅलेंडर) हाच विषय निवडून खूप ताकदीने तो मांडण्यात आला. पण करोनामुळे निधीअभावी ही दिनदर्शिका अत्यल्प छापण्यात आल्याने ती पोचली नाही.
  • राष्ट्रपतींना लाखो पत्रे लिहीली गेली. त्यात माविम चा सहभाग मोठा राहिला.
  • क्यू आर कीड स्कॅन करून काही लाख लोकांनी याचिकेवर सह्या केल्या.
  • मुद्रित व इलेक्ट्रोनिक माध्यमांनी तसेच समाज माध्यमावर यावर्षी या विषयाला दणकट प्रतिसाद मिळाला.२७/२ ला घोषणा होणार असे मानस तयार झाले.
  • पण निराशाच पदरी आली.
  • कारण मोदी सरकारचे भाषाधोरण लोकभाषाविरोधी आहे. त्यांना राज्यघटनेत नमूद भाषा, चलनी नोटेवर लिहिल्या गेलेल्या भाषा यांच्याबद्दल आकस असून ते एक देश एक भाषावादी आहेत. त्यांना संस्कृतचे वर्चस्व पुन्हा लादायचे असून त्यासाठी त्यांना इतर भाषा हा अडथळा वाटतो. मनमोहन सिंग सरकारने तमिळ, संस्कृत, तेलगू,कन्नड, मल्याळम,उडिया अशा सहा भाषांना अभिजात दर्जा दिला. मराठी सर्व निकष पूर्ण करते असा भाषातज्ञांचा अहवाल मिळून ७ वर्षे २२ दिवस उलटले तरी मराठीचा हक्क मोदी सरकारने डावलला आहे. मोदींनी गेल्या साताठ वर्षात एकाही भाषेला हा दर्जा दिलेला नाही.
  • त्यांच्याकडे हिंदी, बंगाली, काश्मिरी, गुजराती व पंजाबीचा तगादा आहे. त्यांच्यासाठी मराठीचा का बळी देताय?
    हवा तर त्यांनाही अभिजात दर्जा द्या, पण आमची अडवणूक थांबवा.
  • दिल्लीत सर्वपक्षीय खासदारांची लॉबी मराठीसाठी उभी करायला हवी. ते काम शरद पवार, उद्वव ठाकरे व नितिन गडकरी हे तिघेच करू शकतात.
  • राज्यातील व राज्याबाहेरील सर्व मराठी माणसांना या जनअभियानात सामील करून घ्यायला हवे. अजूनही शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण विभाग या चळवळीत उतरलेले नाहीत. राज्यातील २७ मनपा व ३६ जिल्हे, ३६४ नगर परिषदा, ३५० तालुके नी २८००० ग्रामपंचायती इथपर्यंत हे अभियान पोचवायला हवे.
  • बृहन्महाराष्ट्रातील सर्व मराठी उपक्रम,राज्यातील सर्व मराठी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, लोकप्रतिनिधी, ग्रंथालये, माध्यमे यात हा विषय लावून धरला जायला हवा. त्यासाठी शासनातर्फे प्रशिक्षण करून स्वयंसेवक तयार करायला हवेत, सांस्कृतिक धोरण, २५ वर्षाचे धोरण, मराठी भाषा विद्यापीठ, मराठी पाट्या, मराठीची सक्ती, मराठी शाळांची गुणवत्ता वाढ, मराठी माध्यमातून शिकलेल्यांच्या यशकथा, वाचन संस्कृतीवर भर असे उपक्रम वर्षभर करायला हवेत. त्यासाठी मोले घातलेवाले धंदेवाईक लोक नाही तर तळमळीचे लोक सोबत घ्यायला हवेत.

 

See the source image

(प्रा. हरी नरके हे ५४ पुस्तकांचे लेखक-संपादक. वक्ते, संशोधक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या साहित्याचे संपादक प्राध्यापक आणि विभागप्रमुख – महात्मा फुले अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ, पुणे [निवृत्त] आहेत.)


Tags: prof hari narkeअभिजात दर्जाप्रा. हरी नरकेमराठीमोदी सरकार
Previous Post

युक्रेनमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील ७२ विद्यार्थी आतापर्यंत दिल्लीत दाखल

Next Post

राज्याचे मुख्य सचिवपदी मनु कुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती

Next Post
मा. मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती 3

राज्याचे मुख्य सचिवपदी मनु कुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!