Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिमाचलसोबतच का नाही झाली गुजरातमधील निवडणुकांची घोषणा?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
ec (2)

मुक्तपीठ टीम

केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी पत्रकार परिषद घेत हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. राज्यात १२ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान निवडणूक आयोग हिमाचल प्रदेशसह गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करेल, अशी अपेक्षा होती. मात्र गुजरातची घोषणा लांबणीवर गेली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा दिवाळीनंतर जाहीर केल्या जातील, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशसह गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा का जाहीर केल्या नाहीत, हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाल्या आहेत.

२०१७ च्या परंपरेचा संदर्भ-

  • गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा का जाहीर केल्या नाहीत याचं उत्तर स्वत: निवडणूक आयोगाने दिले आहे.
  • निवडणूक आयोगाने शुक्रवारी हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये एकाचवेळी विधानसभा निवडणुका जाहीर न करण्यामागे २०१७ मध्ये अवलंबलेल्या परंपरेचा संदर्भ दिला.
  • आयोगाने सांगितले की, यावेळी आदर्श आचारसंहिता विनाकारण वाढवण्यात आली नाही.
  • निवडणूक आयोगाने दोन्ही राज्यांमध्ये एकाच वेळी निवडणुका का जाहीर केल्या नाहीत, या प्रश्नाला उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार म्हणाले की, निवडणूक आयोग निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करताना प्रत्यक्षात नियमांचे पालन करतो.
    आयोगाने पूर्वीची परंपरा पाळली आहे.

गुजरातमध्ये मतमोजणी ८ डिसेंबरला होणार का?

  • २०१७ मध्ये गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या तारखांना जाहीर झाल्या होत्या, परंतु मतमोजणी एकाच वेळी १८ डिसेंबर रोजी झाली होती.
  • निवडणूक आयोगाने शुक्रवारी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
  • १७ ऑक्टोबरला अधिसूचना जारी होणार असून १२ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
  • ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
  • हिमाचल प्रदेशसह गुजरातची मतमोजणी ८ डिसेंबरला होणार आहे का, असे विचारले असता कुमार म्हणाले की, आम्ही गुजरात निवडणुकीची घोषणा करू तेव्हा तुम्हाला कळवू.

निवडणूक आयोगाने परंपरा पाळत प्रत्यक्षात बदल केला…

  • तांत्रिकदृष्ट्या बोलायचे झाल्यास, गुजरातच्या निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबर कालावधीत घेणे अजूनही शक्य आहे, जेणेकरून मतमोजणी एकाच दिवशी होऊ शकेल.
  • निवडणूक आयोगाने २०१७ मध्येही असेच केले होते.
  • काही विरोधी नेत्यांनी सांगितले की, गुजरातच्या निवडणुका नंतर जाहीर करून, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विद्यमान सरकारला अधिक कल्याणकारी योजना सुरू करण्याची संधी मिळू शकते.
  • राजीव कुमार म्हणाले की, निवडणूक आयोगाने परंपरा पाळत प्रत्यक्षात बदल केला.

हिमाचलमध्ये हवामान हा एक अतिशय महत्वाचा घटक!!

  • राजीव कुमार म्हणाले की, एका निवडणुकीच्या निकालाचा दुसऱ्यावर काय परिणाम होतो यासारख्या मुद्द्यांचाही विचार केला जातो.
  • ते म्हणाले की हिमाचल प्रदेश सारख्या राज्यात हवामान हा एक अतिशय महत्वाचा घटक आहे, विशेषत: उच्च उंचीच्या भागात.
  • ते म्हणाले की, सर्व काही तपासून निवडणूक आयोगाने मागच्या वेळी जी परंपरा पाळली होती तीच पाळण्याचा निर्णय घेतला…
  • एकीकडे आम्ही परंपरा पाळली, त्याचवेळी ती बदलली, कारण आदर्श आचर संहितेचा कालावधी अनावश्यकपणे वाढू नये.

Tags: ECGujrat ElectionHimachal Pradesh Electionकेंद्रीय निवडणूक आयोगगुजरात विधानसभा निवडणूकहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक
Previous Post

जालन्यात वृक्ष संवर्धन तर सांगलीचा विक्रम ग्लोबल!

Next Post

‘तारक मेहता’च्या दया बेनला कर्करोग? ‘जेठालाल’कडून ऐका फेक की फॅक्ट…

Next Post
‘तारक मेहता’च्या दया बेनला कर्करोग? ‘जेठालाल’कडून ऐका फेक की फॅक्ट…

'तारक मेहता'च्या दया बेनला कर्करोग? 'जेठालाल'कडून ऐका फेक की फॅक्ट...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!