मुक्तपीठ टीम
आधी प्रसिद्धीच्या झोतात आणि नंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले समीर वानखेडेंविरोधात राज्याच्या उत्पादन शुल्क विभागानं नोंदवलेला गुन्हा हा त्यांच्यासाठी मोठी अडचण निर्माण करणारा आहे. त्यांच्यावर सातत्यानं होत असलेल्या फसवणुकीच्या आरोपांना पुष्टी देणाराच हा गुन्हा आहे. ते सज्ञान नसतानाही ते लपवत घेतलेला बारचा परवाना आता त्यांच्यासाठी अडचणीचा ठरला आहे. ती फसवणूक असल्याने दाखल झालेल्या गुन्ह्यामागील संपूर्ण माहिती मांडणारा एफआयआरमधील तक्रारदार अधिकाऱ्याचा जबाब मुक्तपीठच्या हाती लागला आहे.
समीर वानखेडेंविरोधाती एफआरमधील जबाब जसा आहे तसा…
- जिल्हा – ठाणे शहर
- पोलीस ठाणे – कोपरी
- वर्ष २०२२
- एफआयआर क्र. ००४३
- दिनांक वेळ – १९ फेब्रुवारी २०.०४ वाजता
- कायदे
सीआरपीसी भारतीय दंड संहिता कलम १८१,१८८, ४२०, ४६५, ४६८, ४७१ - गुन्ह्याची घटना काळ – ७ जानेवारी १९९७ ते २१ ऑगस्ट १९९७
First Information contents (प्रथम खबर हकिगत):
जबाब दिनांक:- १८/०२/२०२२मी श्री. सत्यवान शंकर गोगावले, वय ५० वर्षे, धंदा- नोकरी, नेमणुक निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क, सिडको कम्युनिटी सेन्टर, दुसरा मजला, सेक्टर- ३, सानपाडा, नवी मंबई समक्ष ए.पी.एम.सी पोलीस ठाणे येथे हजर राहुन सरकार तर्फे खबर देतो कि, मो.नं.9822977346मी वरिल प्रमाणे असुन राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये सन १९९३ साली पोलीस शिपाई या पदावर भरती झालो असुन सदयस्थितीत निरिक्षक या पदावर सन २०२१ पासुन निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क, सिडको कम्युनिटी सेन्टर, दुसरा मजला, सेक्टर- ३, सानपाडा, नवी मंबई येथे नेमणुकीस आहे. दिनांक १८/०२/२०२२ रोजी अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क, ठाणे यांचे कार्यालयाकडुन ज्ञापन क्रमांक एफ.एल. आर ११२०२१/५३८९/ई/कक्ष-८/४०६, ठाणे प्रमाणे प्राप्त झाले की, समीर ज्ञानदेव वानखेडे, अनुजप्तीधारक हाटेल सदगुरु, ट्रक टर्मिनल बिल्डीग, एफ. एल-3, क्रमांक ८७५, सेक्टर १९, वाशी, ता.जि.ठाणे यांचे विरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत आदेशीत झाले आहे. माझे कार्यालयाच्या हददीतील हाटेल सदगुरु, ट्रक टर्मिनल बिल्डीग, एफ.एल-३, क्रमांक ८७५, सेक्टर १९, वाशी, ता.जि.ठाणे या अनुज्ञप्ती मंजुरीसाठी समीर वानखेडे यांनी मा. अधिक्षक सो, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे या कार्यालयास दिनांक १३/०२/१९९७ रोजी सादर केलेल्या अर्जाची व कागदपत्रांची आमचे कार्यालयाकडुन पडताळणी केली असता त्यांनी परवाना कक्ष अनुज्ञप्ती मिळावी म्हणुन त्यांचे अर्जामध्ये त्यांनी वय नमुद केलेले नाही. परंतु सादर केलेल्या स्टॅम्पपेपरवर/प्रतिज्ञापत्रात सज्ञान असल्याचे नमुद केले आहे व प्रशासनाला खोटी व चुकीची माहिती दिली असल्याचे निष्पन्न झाले आहे. वास्तविक पाहता त्यावेळी त्यांचे वय वर्षे १८ पेक्षा कमी होते व त्यांनी अर्जासोबत खालील प्रमाणे प्रतिज्ञापत्रे राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, चंदनी कोळीवाडा, मीठबंदर रोड, ठाणे (पुर्व) येथील मुख्य कार्यालयामध्ये सादर केलेली होती. समीर वानखेडे यांनी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये श्री. मनमोहनसिंग राठी यांच्याकडुन सदगुरु हाटेल ज्या जागेत सध्या कार्यरत आहे त्या जागेच्या (Apartment No.RST/००२/००११, Sector १९, Truck Terminal Building At APMC Market, Turbhe, Vashi, Navi Mumbai दिनांक १०/१२/१९९६ रोजीच्या २०/- रुपये दराच्या स्टम्प पेपरवर केलेल्या अॅग्रीमेन्ट फार सेलच्या स्टम्प पेपरची प्रत सादर केलेली होती. तत्कालीन वेळी त्यामध्ये समीर वानखेडे यांनी ते सज्ञान असल्याचे नमुद केले होते. तसेच दिनांक ०७/०१/१९९७ रोजी दिनांक १०/१२/१९९६ रोजीच्या २०/-रुपये दराच्या स्टम्प पेपरवर नोटरी समोर केलेल्या प्रतिज्ञापत्रात समीर वानखेडे यांनी ते सज्ञान असल्याचे नमुद केले होते तसेच त्यामध्ये त्यांनी सदर जागेमध्ये कोणताही व्यवसाय केला नसल्याचे आणि त्यामुळे आयकर व विक्रीकर विवरणपत्र सादर केले नसल्याचे नमुद केले होते. त्याचप्रमाणे सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये/स्टम्प पेपरवर ते सज्ञान असल्याबाबत चुकीची माहिती नमुद करीत असल्याचे सकृतदर्शनी दिसुन आलेले होते. याबरोबरच समीर वानखेडे यांनी दिनांक २१/०८/१९९७ रोजीच्या १०००/-रुपये दराच्या स्टम्प पेपरवर श्रीमती. झहिदा डी वानखेडे यांच्या समवेत केलेले भागिदारी पत्राची प्रत सादर केलेले होते. त्यामध्ये त्यांचे वय नमुद केलेले नाही. यावरुन त्यांनी त्यांच्या वयाचा संभ्रम व्हावा तसेच वय 21 वर्षापेक्षा कमी असल्याचे लक्षात येवु नये असा हेतु होता. The Mejority Act १८७५, Code of Civil Procedure १९०८, The Guardian and Ward Act १८९०, The Oaths Act १९६९. The General Clauses Act १८९७ and The Contact Act १८७२ या कायदयातील तरतुदी विचारात घेता समीर वानखेडे हे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सक्षम नव्हते. त्यांनी नमुद कायदयातील तरतुर्दीचे उल्लंघन केलेले आहे. त्यांची जन्म दिनांक १४/१२/१९७९ असल्याबाबत त्यांनी कळविलेले आहे. त्यांनी कलेले प्रतिज्ञापत्र त्याचे वय १८ वर्षापेक्षा कमी असताना केलेले आहे. त्यांचे वय मद्यविक्री अनुज्ञाप्ती मंजुरीसाठी अडसर ठरु नये म्हणुन त्यांनी प्रतिज्ञापत्रात सज्ञान असल्याचे केवळ नमुद केलेले आहे. यावरुन त्यांचे जन्म तारखेनुसार तत्कालीन वेळी सज्ञान नसताना देखील त्यांनी त्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये ते सज्ञान असल्याचे नमुद केले आहे. शासन पत्र क्रमांक बि.पी.ए १०८९/१२३१/३८/पी.आर.ओ-३, दिनांक १९/८/१९८९ अन्वये अनुज्ञाप्ती मंजुरीसाठी वयाबाबत असलेल्या अटींचे उल्लंधन तसेच ते सज्ञान असल्याबाबतची खोटी प्रतिज्ञापत्र सादर करुन त्यांनी सदर एफएल-११अनुज्ञप्ती wilful misrepresentation or Froud करून प्राप्त केल्याचे निष्पन्न झाल्याने मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांनी महाराष्ट्र मद्यनिशेध कायदा १९४९ मधील कलम ५४(१) (बी). ५४(१) (सी) व ५४(१) (ई) अन्वये मे हाटेल सदगुरु, ट्रक टर्मिनल बिल्डीग, एफ.एल-३, क्रमांक ८७५, सेक्टर १९, वाशी, ता.जि.ठाणे ही अनुजाप्ती दिनांक ०१/०२/२०२२ रोजीच्या आदेशानुसार सदर अनुज्ञप्तीचे व्यवहार दिनांक ०२/०२/२०२२ रोज कायमस्वरुपी रदद केले आहे. तसेच त्यांनी अनुज्ञाप्ती रदद करण्याच्या दिनांका पर्यंत म्हणजेच दिनांक ०२/०२/२०२२ पर्यंत लाभ मिळवलेला आहे. म्हणुन तत्कालीन वेळी अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क, ठाणे यांनी केलेल्या आदेशाचा भंग केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावरुन त्यांनी प्रतिज्ञापत्रादवारे प्रशासनाला चुकीची माहिती दिल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मा. जिल्हाधिकारी सो, ठाणे यांनी दिलेल्या आदेश क्रमांक एफएलआर ११२०२१/५३८९/ई/ कक्ष-८/२७०, दिनांक ०१/०२/२०२२ नुसार समीर वानखेडे यांनी सदरची चुक हेतुपुरस्परपणे केलेली असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विरुध्द फौजदारी पात्र गुन्हा दाखल करण्यास मान्यता दिलेली आहे. समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी दिनांक १०/१२/१९९६ रोजीच्या २० रुपये दराच्या स्टम्प पेपरवर अग्रीमेन्ट फार सेलमध्ये तसेच दिनांक १०/१२/१९९६ रोजीच्या २० रुपये दराच्या स्टम्प पेपरवर दिनांक ०७/०१/१९९७ रोजी स्वाक्षरीने शपथपत्रावर शासनाची ठकवणुक करण्याच्या उददेशाने बनावट दस्तऐवज तयार करून तो खरा म्हणुन वापर केला. याबरोबरच दिनांक २१/०८/१९९७ रोजीच्या १००० रुपये दराच्या स्टम्पपेपरवर वयाबाबत संभ्रम व्हावा या हेतुने वय नमुद न करता शासनाची फसवणुक करून खोटया माहितीचे शपथपत्र सादर करून तत्कालीन वेळी अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग ठाणे यांचेकडील आदेशाचा भंग करून स्वताचे वर नमुद आस्थापनेस परवाना कक्ष अनुज्ञाप्ती प्राप्त केला म्हणुन माझी शासनातर्फे समीर ज्ञानदेव वानखेडे याचे विरुध्द भारतीय दंड सहिता कलम १८१, १८८,४२०, ४६५, ४६८, ४७१ प्रमाणे खबर आहे.
हेही वाचा:
जन्मतारखेचा घोळ! एनसीबीफेम समीर वानखेडे फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपी!
जन्मतारखेचा घोळ! एनसीबीफेम समीर वानखेडे फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपी!