मुक्तपीठ टीम
तिवसा पंचायत समितीतील रोजगार हमी योजनेतीली कंत्राटी अधिकारी प्रमोद निंबुरकर यांच्या मृत्यू प्रकरणात तिवस्याचे गटविकास अधिकारी चेतन जाधव यांच्यावर कारवाई केली नाही तर स्वतः गटविकास अधिकाऱ्यांना फटके मारू, अस वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केले.
काय म्हणाले अनिल बोंडे?
- कंत्राटी तांत्रिक अधिकारी प्रमोद निंबुरकर यांच्या मृत्यूनंतर गटविकास अधिकारी चेतन जाधव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अनिल बोंडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.
- जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली नाहीतर गटविकास अधिकाऱ्याला फटके मारू, असं वक्तव्य अनिल बोंडे यांनी केले आहे.
- प्रमोद निंबुरकर यांच्या पत्नीला प्रशासनानं काम द्यावं. प्रशासनाच्या चुकीमुळं निंबुरकर यांचा जीव गेलाय.
- तिवसा मतदारसंघाच्या आमदार आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी निंबुरकर यांच्या पत्नीचं सांत्वन करण्यासाठी जायला हवं होतं.
- मात्र, ते जमत नसेल तर किमान त्यांच्या पत्नीला काम द्यावं.
अनिल बोंडे यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आक्रमक
- अनिल बोंडे यांच्या वक्तव्या विरोधात तिवसा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले आहेत.
- त्यांनी अनिल बोंडे यांचा निषेध केला आहे.
- तिवस्याचे गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव यांना कार्यालयात येऊन मारण्याची धमकी देणे ही बाब असंवैधानिक असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
- काहीं कर्मचाऱ्यांनी कामात अनियमितता केल्यामुळे त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव उपजिल्हाधिकारी यांच्याकडे जाधव यांनी पाठवला होता.
- तेव्हा त्या द्वेषातून एका विशिष्ट लॉबीने राजकारण्यांना हाताशी धरून डॉ. चेतन जाधव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
त्यात तथ्य नाही, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांना धमकी खपवून घेणार नाही, यशोमती ठाकूर
- अनिल बोंडे यांचं वक्तव्य चुकीचं आहे.
- ते त्यांच्या पक्षाची संस्कृती काय आहे ते दाखवत आहेत.
- मागासवर्गीय समाजाचा अधिकारी तिथे आहेय.
- बोंडे अरेरावी करत असतील तर आम्ही तसं होऊ देणार नाही.
या सगळ्या गोष्टीचा निषेध आहे. - अनिल बोंडे यांनी सांभाळून या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत.
- या प्रकरणातील जो अधिकारी होता तो सस्पेंड झाला होता, तो अरेरावीची भाषा करत होता. त्यांचं अपघाती निधन झालं ते दुर्दैवी आहे.
- मात्र, अधिकाऱ्यांना धमकी देणं खपवून घेतलं जाणार नाही, असं अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.