मुक्तपीठ टीम
आजच्या काळात लोकांना बाहेर फिरायला आवडते,लोकांना कार किंवा बाईकवरून फिरायला जास्त आवडत पण असे काही सामान्य चिन्ह आहेत जे आपल्याला माहित नाहीत. कार आणि इतर चारचाकी वाहनांच्या इंधन गेजवरमध्ये असणारा बाणाचे चिन्हाने कधीतरी लक्ष वेधून घेतले असावे. हे का घडते आणि त्याचे महत्त्व काय आहे. जाणून घेवूया…
इंधन गेजवर तो बाण का?
- कार आणि इतर चारचाकी वाहनांच्या इंधन गेजवर बनवलेले हे चिन्ह वाहनाची इंधन टाकी कोणत्या बाजूला आहे हे दर्शविते.
- ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे.
- काही कार आणि इतर मोठ्या वाहनांमध्ये इंधन टाकी डाव्या बाजूला असते, तर काहींमध्ये ती उजवीकडे असते.
- पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी जाताना पेट्रोल भरण्यासाठी गाडी कोणत्या दिशेला ठेवायची हे बाणाचे चिन्ह कारची इंधन टाकी कोणत्या बाजूला आहे हे सांगण्यास मदत करते.
- कारमधील एकूण इंधनापैकी १५% शिल्लक असताना कमी इंधना लाईट साधारणपणे दिसून येतो.
- बॅटरी अॅलर्ट लाइट हे कार डॅशबोर्डचे चिन्ह आहे जे चार्जिंग सिस्टममधील समस्या दर्शवते.