Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पापाराझींमुळे नेहमी सेलिब्रिटी त्रस्त! पण अनुष्काने दिले धन्यवाद! असं का?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
why anushka sharma thanks paparazi

मुक्तपीठ टीम

कसंही, कुठेही, काहीही करुन सेलिब्रिटींना टिपण्याचा प्रयत्न करणारे पापाराझी छायाचित्रकार म्हटलं की अनेक सेलिब्रिटींच्या कपाळावर आठ्या येतातच येतात. पण अनुष्का शर्माने मात्र पापाराझींना धन्यवाद दिले आहेत. तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमधून तिने दिलेला मेसेज वाचण्यासारखाच आहे.

 

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांची जोडी जबरदस्त हीट आहे. दोघेही सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतात. मात्र, त्यानंतरही दोघांनीही आपली मुलगी वामिकाचा फोटो अजूनही सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. वामिका आता एक वर्षांची होणार आहे. विराट-अनुष्काने सोशल मीडियावर शेअर केलेल्या सर्व फोटोंमध्ये वामिकाचा चेहरा दिसत नाही. याच दरम्यान, नुकतेच दक्षिण आफ्रिकेला जात असताना पापाराझींनी अनुष्काच्या मांडीवर वामिकाचा फोटो टिपला होता. मात्र, तो प्रकाशित झाला नाही. त्यामुळे यानंतर अनुष्काने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक मेसेज शेअर केला आहे.

anushka sharma

अनुष्का का म्हणाली थँक यू पापाराझी?

अनुष्काने तिच्या इंस्टा स्टोरीमध्ये लिहिले आहे की, “वामिकाचे फोटो-व्हिडीओ प्रकाशित न केल्याबद्दल आम्ही इंडियन पापाराझी आणि बहुतेक मीडिया हाऊसचे खूप आभारी आहोत. पालक म्हणून आम्ही त्या लोकांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा. आम्हाला आमच्या मुलीसाठी प्रायव्हसी हवी आहे. तिला मीडिया आणि सोशल मीडियापासून स्वतंत्रपणे तिचे आयुष्य जगण्याची संधी देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो.

 

  • अनुष्काच्या इंस्टा स्टोरीमध्ये पुढे असे लिहिले आहे की, ती मोठी होत असल्याने आम्ही तिची हालचाल थांबवू शकत नाही आणि म्हणूनच आम्हाला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे.
  • त्यामुळे कृपया या बाबतीत थोडा सराव ठेवा. फोटो पोस्ट करू नका. फॅन क्लबचे विशेष आभार.

 

वामिकाची झलक पाहण्यासाठी चाहते आतूर, पण….

  • वामिकाचा जन्म यावर्षी ११ जानेवारीला झाला होता आणि लवकरच तिचा पहिला वाढदिवस येणार आहे.
  • मात्र आतापर्यंत विराट आणि अनुष्काने आपल्या मुलीचा एकही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाही.
  • त्याच वेळी, वामिकाचा चेहरा कोणत्याही पब्लिक अॅपिरियेंसमध्ये दाखवण्यात आलेला नाही.
  • वामिकाची एका झलक पाहाण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

 

विराटलाही लेकीची प्रसिद्धी आताच नको!

खरंतर चाहत्यांना वामिकाला पाहण्याची इच्छा आहे, अशा परिस्थितीत जेव्हा विराट कोहलीला विचारण्यात आले की त्याने अद्याप आपल्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर का शेअर केला नाही, या प्रश्नावर तो म्हणाला, ‘एक जोडपे म्हणून, आम्ही ठरवले आहे की आम्ही आमच्या लहान मुलीला जोपर्यंत सोशल मीडिया आणि तिच्या आवडीनिवडींबद्दल कळत नाही तोपर्यंत तिला उघड करणार नाही.’


Tags: Bollywood actress Anushka SharmaBollywood celebritiescelebritiescricketer Virat KohliInsta StoryInstagram appmuktpeethPaparazziइंस्टा स्टोरीइंस्टाग्रामक्रिकेटर विराट कोहलीपापाराझीबॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माबॉलिवूड सेलिब्रिटीसेलिब्रिटी
Previous Post

ऑक्टोबरमध्ये बेपत्ता मासेमारी बोट समुद्र तळी सापडली, नौदलाच्या कामगिरीमुळे अपघात टळणार

Next Post

राज्यपालांच्या हस्ते देशभरातील कलाकारांच्या ‘एक्झिम बाजार’ प्रदर्शनाचे उद्घाटन

Next Post
Governor Koshyari inaugurates EXIM Bazaar in Mumbai

राज्यपालांच्या हस्ते देशभरातील कलाकारांच्या 'एक्झिम बाजार' प्रदर्शनाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!