Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

दुखवट्याची सुट्टी: श्रद्धांजली वाहण्यासाठी, आदरासाठी सुट्टी हाच पर्याय?

February 8, 2022
in featured, घडलं-बिघडलं, व्हा अभिव्यक्त!
0
Why a holiday for grief?

हेरंब कुलकर्णी

लता मंगेशकर यांच्या मृत्यूमुळे सोमवारी राज्यात सुटी जाहीर करण्यात आली. मी या सुटीचा लाभार्थी असल्याने मी विचार केला की आज लतादीदींचे दिवसभर मी काय स्मरण केले ? लेख वाचले, गाणी ऐकली पण यासाठी दिवसभर सुटी गरजेची होती का ? या सुटीमुळे एका व्यक्तीने कोर्टाची तारीख रद्द झाल्याने १३०० रु तिकिटाचे बुडाल्याचे फेसबुकवर सांगितले आहे. मुळात श्रद्धांजली वाहण्यासाठी व आदर व्यक्त करण्यासाठी सुटी हाच पर्याय आहे का ? याच्यावर आज आता चर्चा व्हायला हवी.

 

जयंती, पुण्यतिथीत आदर व्यक्त करण्यासाठी सुटी हाच पर्याय निवडला जातो आणि प्रमुख व्यक्ती वारल्यावर तर सुटी देणे हेच सर्वात सोपे कर्तव्य मानले जाते. त्या दुःखामध्ये कोणी काहीच बोलत नाही पण खरंच याचा आपण विचार करणार आहोत की नाही ?

 

जे. कृष्णमूर्ती यांच्या प्रेरणेने कृष्णमूर्ती फाउंडेशनने जगात शाळा सुरू केल्या. जे.कृष्णमूर्ती राजघाट वाराणसी, येथे जास्त राहत होते.मी त्या शाळेत गेल्यावर प्रश्न विचारला की कृष्णमुर्ती ज्या दिवशी वारले त्या दिवशी तुम्ही काय केले ? ते म्हणाले की कृष्णमूर्ती गेल्याची बातमी आली,दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मुलांना प्रार्थनेच्या वेळी सांगितले. श्रद्धांजली वाहिली व शाळेचे काम नियमित सुरू राहीले.

 

शाळेच्या संस्थापक व्यक्तीच्या मृत्यूनंतरही शाळा बंद राहिली नाही. हे कृष्णमूर्ती शाळेचे वेगळेपण आणि आपल्याकडे न्यायालयापासून सगळे काही आज बंद राहीले…

 

हे मान्य आहे की श्रद्धांजली कशी वाहायची ?

त्या व्यक्तीप्रति आदर कसा व्यक्त करायचा ?

 

त्या व्यक्तीच्या फोटोला हार घालून श्रद्धांजली सभा घेणे हे नक्कीच करता येईल किंवा लता मंगेशकर यांच्या निधनानंतर सोमवारी प्रत्येक कार्यालयात शाळा-कॉलेजात दुपारनंतर त्यांची गाणी एकत्रित ऐकणे; त्यांच्यावर आलेले सर्व लेख एकत्र वाचणे असे करता आले असते पण असे सकारात्मक उपाय अजिबात केले जात नाहीत. डॉक्टर अब्दुल कलाम यांनी माझ्या मृत्यूनंतर सुटी देऊ नका असे म्हटले होते परंतु त्यांच्या मृत्यूनंतरसुद्धा सर्वत्र सुटी देण्यात आली कारण ती सुटी थांबवायला ते जिवंत नव्हते.

 

जयंती पुण्यतिथीला दिल्या जाणाऱ्या सुट्टीमध्ये तो महापुरुष सामान्य माणसापर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत कर्मचाऱ्यांपर्यंत नीट पोहोचत नाही कारण घरी विद्यार्थी,कर्मचारी राहिल्यामुळे त्यांच्यावरची भाषणे होत नाहीत. उलट शाळा कॉलेज कार्यालय सुरू राहिली तर त्यांच्या विचारांवर चर्चा भाषणे असे काही होऊ शकते..यासाठी उत्तर प्रदेश सरकारने जयंती पुण्यतिथीच्या सर्व सुटी रद्द केल्या..

 

असे अनेक सण आहेत की त्या सुटीच्या दिवशी काहीच काम नसते उदारणार्थ आषाढी एकादशीच्या दिवशी,रामनवमीची सुटी असेल तर जवळच्या विठ्ठल व राम मंदिरात धार्मिक व्यक्ती जाण्यापलीकडे दुसरे काय करतात ?

 

ज्या शाळेत एकही ख्रिश्चन विद्यार्थी नाही तिथे १० दिवस नाताळाची सुटी असते आणि एकही पारशी नसलेल्या जिल्ह्यात पारशी दिनाची सर्वत्र सुटी असते..अन्य धर्मीय सणाच्या सुटीच्या दिवशी तर इतरांनी काय करावे हा प्रश्नच असतो ..!!!

 

तेव्हा या विषयावर अनेकदा चर्चा झाल्या सुटी नको हे सर्वजण म्हणतात पण टाळण्यासाठी किंवा बदलण्यासाठी सकारात्मक पर्याय व्हायला हवेत त्याचा एखाद्या संस्थेने पाठपुरावा करायला हवा..

 

सर्व सुट्ट्यांचे कॅलेंडर समोर ठेवून या सुट्टीची गरज काय या सुटीऐवजी असे करायला हवे असे पर्याय मांडायला हवेत.

 

सणांसाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला ७ राखीव सुटी द्यावी अशी सूचना अनेकदा आली आहे ..हिंदू व्यक्ती हिंदू सणांसाठी मुस्लिम व्यक्ती मुस्लिम सर्वांसाठी ती सुट्टी घेईल व जास्त सुट्ट्या हव्या असतील तर त्यासाठी रजा काढावी अशी एक सूचना अनेकदा मांडली जाते त्याचाही विचार करायला हवा…

 

खटले तुंबले आहेत पण न्यायालये उन्हाळ्याची सुटी घेतात आणि सरकारी कर्मचारी संघटनांनी भांडून ५ दिवसांचा आठवडा करून घेतला व आठवड्यात दोन दिवस सुटी घेतली जाते

 

शाळा, महाविद्यालये फक्त २२० दिवस चालतात म्हणजे किमान १४५ दिवस बंद असतात (सुमारे ५ महिने) , रविवार वगळता किमान ती ३०० दिवस तरी ती चालायला हवी यासाठी धोरण आवश्यक आहे. .मे महिना,दिवाळी,नाताळ या सुटी खरेच गरजेच्या आहेत का…? कोणकोणत्या सुटी कमी करायला हव्यात ?

 

लता मंगेशकर यांच्या दुखवटा सुटीच्या निमित्ताने सोमवारी लता मंगेशकर यांच्यासाठी मी काय आदर व्यक्त केला ? हे मला स्वतःला सांगता येणार नाही तर इतरांचे मी काय बोलू…?

 

सुटीला पर्याय काय असू शकतो ? आदर व्यक्त कसा करायला हवा .. यावर जरूर व्यक्त व्हावे

 

( राज्यातील एकूणच सुटी या विषयावर तपशीलवार अभ्यास करून अहवाल,याचिका कोणी करणार असाल तर herambkulkarni1971@gmail. com वर जरूर कळवावे )

 

Heramb Kulkarni Author Education Expert

(हेरंब कुलकर्णी हे शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक आणि कार्यकर्ते आहेत. कोरोना काळात अनाथ झालेली मुलं, वैधव्य आलेल्या महिलांसाठीही ते कोरोना एकल पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक म्हणून सातत्यानं कार्यरत आहेत.)


Tags: Heramb Kulkarnilata mangeshkarलता मंगेशकरहेरंब कुलकर्णी
Previous Post

अरे बाप रे! सरकारने कोरोना योद्धा वैमानिकाला मागितली विमान अपघातासाठी ८५ कोटी नुकसानभरपाई! स्वत: मात्र विमाच भरला नव्हता!

Next Post

“किराणा दुकानात वाइन ठेवाल तर दुकानच बंद करणार!” सुजय विखे, इम्तियाज जलिल आक्रमक!!

Next Post
Sujay Vikhe Patil And Imtiaz Jalil Warning to MVA Govt on Wine issue

"किराणा दुकानात वाइन ठेवाल तर दुकानच बंद करणार!" सुजय विखे, इम्तियाज जलिल आक्रमक!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!