Monday, June 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोल्हापूरचं काय ठरलंय?

April 10, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Kolhapur by election promotion

मुक्तपीठ टीम

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रचार आज पाच वाजता संपेल. या मतदारसंघातील लढतीवर महाविकास आघाडी आणि भाजपाने कमालीचा जोर लावला. महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आल्यापासून झालेल्या आजवरच्या दोन पोटनिवडणुकांमध्ये एक भाजपाला तर एक भाजपाला मिळाली आहे. आताची ही तिसरी पोटनिवडणूक जे जिंकतील ते त्यांचाच जोर जास्त असण्याचा दावा करतील. त्याचा परिणाम विधानसभेतील बहुमतावर होणार नसला तरी दोन्ही बाजूंच्या कुंपणावरच्या आमदारांवर होऊ शकतो.

 

बिनविरोधचा प्रयत्न अयशस्वी!

  • कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील आमदार चंद्रकांत जाधव यांचे कोरोनामुळे निधन झाले.
  • त्यांच्या निधनानंतर रिकाम्या झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक होत आहे.
  • काँग्रेसचे नेते, गृहराज्यमंत्री आणि पालकमंत्री सतेज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले होते.
  • मात्र भाजपाने प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे या पोटनिवडणुकीत लढत रंगली.

 

लढत कुणामध्ये?

  • काँग्रेस – दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव या महाविकास आघाडीच्या उमेदवार.
  • भाजपा – सत्यजित कदम हे लढतीत उतरले आहेत.

 

आघाडीनं राखण्यासाठी जोर लावला!

काँग्रेसचा उमेदवार असला तर पूर्णच महाविकास आघाडी ताकदीनिशी कोल्हापूरची लढाई लढत होती. सतेज पाटील यांनी ऋतुराज पाटील यांच्यासह शिवसेना आणि राष्ट्रवादीशी समन्वय साधत प्रचाराची आघाडी सांभाळली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनीही वेळ दिला. तसेच खासदार अमोल कोल्हे यांची तोफही कोल्हापुरात धडाडली. हा मतदारसंघ शिवसेनेकडे पाच निवडणुका असल्याने तो शिवसेनेलाच मिळावा अशी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची मागणी होती. मात्र, उद्धव ठाकरेंनी समजूत काढल्यानंतर ते शांत झाले. तरीही भाजपा नेते शिवसैनिक आणि शिवसेनेचे मतदार भाजपासोबत असल्याचे शेवटच्या दिवशीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे अखेरच्या दिवशी शेवटचं भाषण हे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं असावं, असं नियोजन करण्यात आलं आहे.

 

भाजपाचा कोल्हापुरात पंढरपूरचा प्रयत्न!

पोटनिवडणुकीच्या प्रचारात आघाडीप्रमाणेच भाजपानेही जोर लावला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्याहून कोल्हापुरातच तळ ठोकून होते. त्यांनी प्रदेश भाजपाचीही सर्व यंत्रणा कोल्हापुरातच उतरवली होती. भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंसह अनेक नेते कोल्हापुरात माध्यम आणि प्रचाराची जबाबदारी सांभाळत होते.

कोल्हापूर का महत्वाचं?

  • महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून दोन पोटनिवडणुका झाल्या. कोल्हापूरची तिसरी पोटनिवडणूक आहे.
  • पंढरपूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील जागा भाजपाने हिसकावून घेतली. तेथे भाजपाचे समाधान आवताडे विजयी झाले.तेथे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी आणि स्थानिक समीकरणे भाजपाला उपयोगी ठरली
  • नांदेडमधील देगलूर पोटनिवडणुकीत काँग्रेसचे आमदार अंतापुरकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे लढणारे काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी झाले. तेथे भाजपाने शिवसेनेच्या माजी आमदाराला लढतीत उतरवून शिवसेनेची मते कमळाकडे वळवण्याचा प्रयत्न केला होता. पण तो अयशस्वी ठरला.
    आता ही तिसरी पोटनिवडणूक आहे. आतापर्यंत एक एक असे विजय मिळालेत. आता तिसरा विजय दोन्ही बाजूंसाठी महत्वाचा ठरेल.
  • विधानसभेतील बहुमत संख्याबळासाठी एखादी जागा महत्वाची नाही.
  • पण कुंपणावरच्या आमदारांच्या मनोधैर्यासाठी या निवडणुकीचा निकाल खूप महत्वाचा ठरेल.
  • ऑपरेशन लोटस सारखे प्रयोग करायचे झाल्यास आमदारांना भाजपाकडे वळवून पुन्हा निवडून आणायची हमी देणे भाजपाला सोपे जाईल.
  • तसेच आघाडीसाठी मतदारांचा कौल हा तीन पक्षांच्या सरकारच्या बाजूनेच असल्याचे दाखवून देण्यासाठी हा निकाल खूप महत्वाचा आहे.

 

कोल्हापूरकरांचं काय ठरलंय?

  • कोल्हापुरात पाचवेळा शिवसेना निवडून आली आहे. २०१४मध्ये शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांनीच काँग्रेसचे सत्यजित कदम यांचा पराभव केला होता. ते कदम हेच सध्या भाजपाचे उमेदवार आहेत.
  • सुरुवातीच्या काळातील स्थानिक शिवसेनेतील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या नेत्यांनीही केला.
  • जर ती दूर झाली असेल तर आघाडीसाठी लढत सोपी जाईल.
  • राज्यात कोरोना लाटते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय ठरले, घराघरात पोहचले. त्यांची लोकप्रियता, शरद पवारांचा प्रभाव आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची पकड, सहानुभुती यावर आघाडीची परीक्षा आहे.
  • भाजपाने ही लढत प्रतिष्ठेची करत संपूर्ण बळ झोकून दिलं आहे. भाजपाने आघाडीवर केलेले सततचे घोटाळ्यांचे आरोप, तसेच कोल्हापूरसाठी जाहीर केलेला वचननामा आणि शिवसेनेत जर नाराजी असेल तर ती यावर भाजपाची भिस्त आहे.
  • कोल्हापूरमध्ये आमचं ठरलंय…खूप लोकप्रिय आहे. आता या पोटनिवडणुकीत कोल्हापूरकरांचं काय ठरलंय, ते १६ एप्रिललाच स्पष्ट होईल.

 

पाहा:

कोल्हापूरचं काय ठरलंय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाषण

कोल्हापूर प्रचारात सतेज पाटील यांचं दणदणीत, खणखणीत भाषण

 

“कोल्हापूर भाजपाच जिंकणार! फडणवीसांचा निर्धार!!”

 

खासदार अमोल कोल्हेंची कोल्हापुरात धडाडली तोफ

 

कोल्हापूर निवडणुकीसाठी भाजपाचा वेगळा वचननामा!

 


Tags: amol kolhechandrakant patilcm uddhav thackeraydevendra fadnavisKolhapurKolhapur Northsatej patilSatyajeet Kadamsharad pawarकोल्हापूरकोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुक
Previous Post

प्रवाशांनी भरगच्च भरलेल्या ट्रेनच्या डब्यातून घोड्याचा प्रवास!

Next Post

कोल्हापूरचं काय ठरलंय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाषण

Next Post
कोल्हापूरचं काय ठरलंय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाषण

कोल्हापूरचं काय ठरलंय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!