Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी छत्रपतींना कोण साथ देणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sambhaji Chhatrapati (3)

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातून निवडून दिल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जून रोजी मतदान होणार आहे. पाच जागांचं चित्र स्पष्ट असलं तरी सहाव्या जागेसाठी मात्र चुरस आहे. भाजपाचं २०१४पेक्षा २०१९मध्ये संख्याबळ घटल्यानं आपली तिसरी जागा टिकवण्यासाठी या जागेवर प्रयत्न करावे लागणार आहेत. तर त्याचवेळी स्वराज्य संघटनेचे नेते संभाजी राजे छत्रपती यांनी अपक्ष म्हणून सहाव्या जागेसाठी उमेदवारी जाहीर केल्याने आता त्यांना कोण साथ देईल, यावरही राजकीय पर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

राज्यसभेच्या ५७ खासदारांच्या जागांसाठी निवडणुकीची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रातून सहा खासदार निवडून जाणार आहेत. आता महाराष्ट्रात सहाव्या जागेसाठी मोठी चुरस दिसण्याची शक्यता आहे. सहावी जागा भाजप राखणार की राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी जिंकणार याकडे लक्ष लागलं आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह १५ राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होणाऱ्या ५७ खासदारांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जून, २०२२ रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेतील सध्याच्या आमदारांचे संख्याबळ लक्षात घेता, भाजपला महाराष्ट्रातील तिसरी जागा राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ मे आहे.

महाराष्ट्रातून कोण निवृत्त?

भाजपा

  • पीयूष गोयल
  • विनय सहस्रबुद्धे
  • विकास महात्मे

शिवसेना

  • संजय राऊत

राष्ट्रवादी काँग्रेस

  • प्रफुल पटेल

काँग्रेस

  • पी. चिदंबरम

राज्यसभेसाठी मतदान कसे होणार?

  • महाराष्ट्र विधानसभेचे २८८ सदस्य या निवडणुकीत मतदार आहेत.
  • राज्यसभेच्या एका जागेमागे ४२ मतांचा कोटा आहे.
  • कोटा आणि पक्षीय संख्याबळानुसार भाजपाचे दोन, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक असे पाच उमेदवार सहज निवडून येऊ शकतात.

सहाव्या जागेसाठी चुरस

  • भाजपाचे दोन उमेदवार आरामात निवडून आल्यानंतरही २२ मते अतिरिक्त राहतील.
  • महाविकास आघाडीकडे २७ मते अतिरिक्त उरतील.
  • इतर पक्षांकडे २९ मते आहेत.
  • त्यामुळे भाजपाने आपला तिसरा उमेदवार मैदानात उतरवल्यास त्यांना इतर पक्षांकडील किमान २० मतांची व्यवस्था करावी लागेल.
  • जर महाविकास आघाडीने आपला तिसरा उमेदवार उतरवला तर त्यांना इतर पक्षांमधून १५ मते जमवावी लागतील.

संभाजी छत्रपतींना पाठिंबा मिळणार?

  • संभाजी राजे छत्रपती यांनी जाहीर केल्याप्रमाणे ते अपक्ष उभे राहिले आणि त्यांना सर्व पक्षांचा पाठिंबा मिळाला, तर राज्यसभेच्या सहा जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होणे शक्य आहे.
  • पण तसे घडणार का, हाच खरा प्रश्न आहे.
  • जर ते आघाडी किंवा भाजपा यांच्यापैकी एकाच्या पाठिंब्याने अपक्ष उभे राहिले तर त्यांच्यापुढे उरलेली मते जमवण्याचं आव्हान असेल. ते त्यांच्यासाठी कोण करणार, हाही प्रश्न आहे.
  • त्यामुळे राज्यसभेवर त्यांना सन्मानाने पाठवलं जाईल का, हाच खरा प्रश्न आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम

  • या निवडणुकीसाठी २४ मे रोजी निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे.
  • ३१ मे ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.
  • १ जून रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल.
  • ३ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.
  • १० जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४पर्यंत मतदान होईल
  • १० जूनलाच सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होऊन निकाल.

Tags: MaharashtraRajyasabhasambhaji chhatrapatiमहाराष्ट्रराज्यसभासंभाजी छत्रपती
Previous Post

वैद्यकीय महाविद्यालयीन प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सरसकट शिष्यवृत्ती द्या – अध्यापक भारती

Next Post

शेतात ऊस वाळून लाकडं झाली…गोड ऊसाची कडू नाही दाहक कहाणी!

Next Post
Sugarcane

शेतात ऊस वाळून लाकडं झाली...गोड ऊसाची कडू नाही दाहक कहाणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!