Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मेरी थार्प कोण होती? गुगलने डूडल बनवून आठवणींना केले ताजे…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Marie Tharp

मुक्तपीठ टीम

गुगल डूडलच्या माध्यमातून एखादा खास दिवस किंवा एखादा खास प्रसंग अनेकदा साजरा केला जातो. आजकाल गुगल आपल्या प्लॅटफॉर्मवर डूडल शेअर करत आहे. गूगलने २१ नोव्हेंबर रोजीही असंचं काहीसं केलं आहे. एका महिलेचे हे डूडल पाहायला मिळाले. ही महिला कोण आहे, तिचं हे डूडल का बनवलं? असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे.

गुगलच्या डूडलवरील ‘ही’ महिला कोण आहे?

  • २१ नोव्हेंबर २०२२ रोजी गुगलचे होम पेज उघडले तर त्यात डूडल दिसेल.
  • गुगलने अमेरिकेच्या एका महान महिला वैज्ञानिकावर हे डूडल बनवले.
  • गुगलने या खास डूडलमध्ये अमेरिकन भूगर्भशास्त्रज्ञ आणि समुद्रशास्त्रीय कार्टोग्राफर मेरी थार्प यांच्या जीवनाबद्दल सांगितले.
  • मेरी थार्प यांनी या क्षेत्रात आपला प्रदीर्घ काळ आणि अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले आहे.
  • १९९८मध्ये त्यांनी कॉन्टिनेंटल ड्रिफ्टची तत्त्वे सिद्ध करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते, ज्यामुळे काँग्रेसच्या लायब्ररीने त्यांना २०व्या शतकातील सर्वात महान कार्टोग्राफरची पदवी दिली.

मेरी थार्प यांच्या जीवनाशी संबंधित काही मनोरंजक गोष्टी

  • मेरी थार्प यांचा जन्म ३० जुलै १९२० रोजी झाला.
  • त्यांचा जन्म मिशिगनमधील यप्सिलांटी येथे झाला.
  • मेरी थार्प यांचे वडील अमेरिकेच्या कृषी खात्यात काम करत होते.
  • मेरी थार्पने पेट्रोलियम जिओलॉजीमध्ये मास्टर्स पदवीसाठी मिशिगन विद्यापीठात प्रवेश घेतला. हा एक अतिशय प्रभावशाली निर्णय होता कारण, त्यावेळी फार कमी महिलांनी विज्ञान क्षेत्रात काम केले होते.
  • १९४८ मध्ये, मेरी न्यूयॉर्कला गेल्या आणि लॅमॉन्ट जिओलॉजिकल ऑब्झर्व्हेटरीमध्ये काम करणारी पहिली महिला बनल्या.
  • येथेच त्यांची भूगर्भशास्त्रज्ञ ब्रूस हीझेन यांच्याशी भेट झाली.
  • हीझेन यांच्याबद्दल बोलताना, त्याने अटलांटिक महासागरावर खूप खोल डेटा गोळा केला होता आणि मेरीने हा डेटा समुद्राच्या तळाचा नकाशा तयार करण्यासाठी वापरला.

मेरी थार्प यांनी ब्रूस हीझेन यांच्यासह केले काम

  • ब्रूस यांच्याकडे अटलांटिक महासागराशी संबंधित खूप सखोल संशोधन आणि डेटा होता, ज्याचा उपयोग मेरी थार्प यांनी समुद्राच्या तळाचा नकाशा तयार करण्यासाठी केला होता.
  • इतकेच नाही तर इको साउंडर्सच्या नवीन शोधांमुळे त्याला मिड-अटलांटिक रिजच्या शोधात खूप मदत झाली.
  • पाण्याची खोली जाणून घेण्यासाठी इको साउंडर्सचा वापर केला जातो.
  • मेरी यांनी हे संशोधन गोळा करून हीझेन समोर सादर केले. त्यांनी या संशोधनाकडे दुर्लक्ष केले परंतु नंतर जेव्हा त्याने या व्ही-आकाराच्या क्रॅकची भूकेंद्राच्या नकाशाशी तुलना केली तेव्हा तो या डेटाकडे दुर्लक्ष करू शकला नाही.

१९५७ मध्ये, मेरी थार्प आणि ब्रूस हीझेन यांनी मिळून अटलांटिक समुद्राच्या तळाचा पहिला नकाशा प्रकाशित केला. बरोबर २० वर्षांनंतर, नॅशनल जिओग्राफिकने थार्प आणि हीझेन यांच्याद्वारे संपूर्ण समुद्राच्या तळाचा पहिला नकाशा प्रकाशित केला. त्यांनी या नकाशाला ‘द वर्ल्ड ओशन फ्लोर’ असे नाव दिले. १९९५ मध्ये, थार्पने आपला नकाशा संग्रह लायब्ररी ऑफ काँग्रेसला दान केला.

मेरी शार्प यांना अग्रगण्य समुद्रविज्ञानासाठी वार्षिक लॅमॉट डोहर्टी हेरिटेज पुरस्कार प्रदान करण्यात आला. मेरी थार्प यांचे २३ ऑगस्ट २००६ रोजी न्यूयॉर्क येथे वयाच्या ८६व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले.


Tags: American Woman ScientistGoogle doodleMarie TharpmuktpeethOceanographic Cartographer Marie Tharpअमेरिकन महिला वैज्ञानिकगुगल डूडलघडलं-बिघडलंमुक्तपीठमेरी थार्पसमुद्रशास्त्रीय कार्टोग्राफर मेरी थार्प
Previous Post

विधानसभा अध्यक्षांकडून ऋतुजा रमेश लटके यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ

Next Post

नाविन्यपूर्ण उपक्रम आणि स्टार्टअपसाठी स्वीडनने महाराष्ट्रात गुंतवणूक करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post
U.S. Consulate General Mike Hankey यांचे समवेत भेट व चर्चा 2

नाविन्यपूर्ण उपक्रम आणि स्टार्टअपसाठी स्वीडनने महाराष्ट्रात गुंतवणूक करावी - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!