मुक्तपीठ टीम
सध्या देशात गाजत असलेल्या बुल्लीबाई अॅपची सूत्रधार ही उत्तराखंडमधील श्वेता ही तरुणी असल्याने खळबळ माजली आहे. कदाचित तिच्या आर्थिक परिस्थितीमुळे तिला या कामासाठी वापरून घेतले असल्याची शक्यता आहे. पोलीस आता तिची चौकशी करून नेमकं काय घडलं त्याचा तपास करतील. त्यानंतरच ती सूत्रधार आहे की या डिजीटल बदनामी कटातील एक प्यादी हे स्पष्ट होऊ शकेल.
मुस्लिम महिलांची सोशल मीडियावरील छायाचित्र वापरून त्यांना आजची बुल्लीबाई म्हणून अॅपवर बदनाम केलं जात असे. त्या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात बंगळुरूहून विशाल कुमारला अटक करण्यात आली आहे. त्याच्याशी मैत्रीतूनच श्वेता सिंहने बुल्लीबाई अॅप लाँच केल्याचे म्हटले जाते.
श्वेता सिंह सूत्रधार?
- उत्तराखंडमधील तरुणी श्वेता ही या प्रकरणाची सूत्रधार असल्याचे सांगितले जाते.
- सध्या मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून तिची चौकशी सुरू आहे.
- बिकट आर्थिक स्थिती असलेल्या कुटुंबातील या अवघ्या १८ वर्षांच्या मुलीच्या मनात मुसलमानांबद्दल खरंच इतका द्वेष आहे की झटपट मोठा पैसा कमावण्याच्या लोभाने ती या जाळ्यात अडकली, याबद्दल चौकशी सुरु आहे.
कोण आहे श्वेता सिंह?
- श्वेता सिंह ही उत्तराखंडमधील उधमसिंगनगर जिल्ह्यात राहते.
- मुस्लिम महिलांचे फोटो एडिट करून ते इंटरनेटवर व्हायरल करण्याचा आणि ‘बुल्लीबाई’ नावाच्या अॅपवर त्यांचा लिलावाचा बदनामीकारक प्रकार सुरू होता.
- बुल्लीबाई अॅपमागे श्वेता सिंह असल्याचे सांगण्यात येत आहे.
- श्वेताच्या आई आणि वडिलांचे निधन झाले आहे.
- त्यामुळे ती आणि तिच्या बहिणीवर सर्व जबाबदारी आहे.
- श्वेता फक्त बारावी उत्तीर्ण झाली आहे.
- श्वेताला सिव्हील इंजीनियर होण्याची इच्छा आहे.
- ती मोबाइलवर जास्त वेळ घालवत असे.
- श्वेता आणि बंगळुरूच्या विशालमध्ये सोशल मीडियावरून मैत्री झाली होती.
- त्यामुळे आता दोघांच्या चौकशीनंतर खरा सूत्रधार कोण ते स्पष्ट होईल.