मुक्तपीठ टीम
ठाण्यात शिवसेनेला मोठं खिंडार पडलेलं आहे. ठाणे महानगरपालिकेतील ६७ नगरसेवकांपैकी ६६ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.मात्र या सर्वांमध्ये ‘ती’ १ निष्ठावान नगरसेविका कोण? आहे हीच चर्चा रंगली आहे. तर ६७ नगरसेवकांपैकी खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे ही मात्र शिवसेनेतच आहेत.
शिवसेनेचे ६६ नगरसेवक मुख्यमंत्री शिंदेंसोबत!
- ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांना व्यक्तिशः मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
- धर्मवीर आनंद दिघे यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेने ठाणे जिल्ह्याची सूत्रे आली होती.
- शिवसेनेचे स्थानिक पातळीवर सर्व निर्णय हे एकनाथ शिंदे हेच घेत असत.
- त्यांच्या कारभारात मातोश्री किंवा शिवसेनाभवनवरूनही हस्तक्षेप नसे.
- ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे.
- ठाणे महापालिकेचे ६६ नगरसेवक हे शिंदे गटात सहभागी झाले.
- यामध्ये माजी महापौर नरेश मस्के समवेत हे सगळे नगरसेवक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
- यामुळे शिवसेनेपुढील अडचणी वाढल्या आहेत.
- ६७ नगरसेवकांपैकी ६६ नगरसेवक सोडून गेले. पण एक कोण गेले नाही, याचा शोध सुरु झाला.
६७ नगरसेवकांपैकी खासदार राजन विचारे यांच्या पत्नी शिवसेनेतच!
- शिवसेनेचे स्थानिक खासदार राजन विचारे हे पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत.
- त्यामुळे त्यांच्या पत्नी नगरसेविका नंदिनी विचारे याही उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिल्या आहेत.
- बंडखोरीच्यावेळी ते यात्रेसाठी गेले होते, पण त्यांचे समर्थक माजी नगरसेवक, पुतण्यांनी कार्यालयाबाहेर पहारा देत उद्धव ठाकरेंची छायाचित्र असलेले फलक काढू दिले नाहीत.
- शिवसेनेकडून राजन विचारे यांची खासदार भावना गवळींच्या जागी लोकसभा प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे.